Sunday, May 30, 2021

जाहिरातीसाठी लेख अकोले (शांताराम काळे )महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान हे मधुकरराव पिचड यांचे गुरू. त्यांचे विचार पिचड यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाचे ठरले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते अकोल्यात आले. प्रस्थापित मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू पिचड यांना तालुक्यातील मातीने व पाण्याने दिले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले. १९८० मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्यातील पाणी शेतीला कसे मिळेल, याचे नियोजन केले. भंडारदरा चाक बंद आंदोलन करून तालुक्याच्या वाट्याला पाणी देऊन पाणीदार नेता अशी ओळख मिळवली .आजही ८०वर्षे पूर्ण होऊनही आपल्या कार्य कर्तुत्वाने समाजमनाला गवसणी घालणारा ८१ वर्षात पदार्पण करणारा तरुण नेता कोरोना काळातही सातत्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी धडपड करताना दिसत आहे .ओसाड उजाड माळ रानावर हिरवाईचे मळे फुलविणारे "भगीरथ "आज ८१ व्या वर्षात पदार्पण करत असताना तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्रिवार मनाचा मुजरा व शुभेच्छा ..... कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मधुकरराव पिचड यांनी पंचायतसमितीचे सभापती म्हणून तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला . त्यावेळी स्वर्गीय दादासाहेब रुपवते , यशवंतराव भांगरे , साठी अमृतभाई मेहता हे दिग्गज तालुक्यात नेतृत्व करत होते मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विधायक राजकीय महत्वकांक्षा जोडीला कार्यकर्ते , मोठा लोकसंग्रह या बळावर मधुकर पिचड साहेब यांनी तालुक्यावर स्वतःची राजकीय पक्कड मजबूत केली. सभापतीपासून सुरु झालेला त्याचा कार्य कर्तृत्वाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेला . आमदार , राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री , विरोधीपक्ष नेते ,पक्षाचे अध्यक्ष ,राज्यातील नव्हे तर देशातील आदिवासींचे मसीहा ,नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्मान केली त्यांना व्यापक समाज मान्यता मिळत गेली . विविध खात्यांचा पदभार सांभाळताना अफाट क्षमतेचे राजकीय नेते असे बिरुद त्यांना लावले गेले . अकोले तालुक्यात निळवंडे प्रकल्पाच्या उभारणीचा अगस्ती साखर कारखाना , अमृतसागर दूध संघ ,कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,या संस्थांच्या उभारणीत त्याचे अतुलनीय योगदान आहे . टिटवी , घोटी शिलवंडी , बलठन ,येसार्थव , पिंपळगाव खांड , अंबित असे छोटे मोठे २४ जलाशय प्रकल्प उभारले त्यामुळे अकोले तालुक्यातील उजाड , ओसाड शिवार समृद्धीने फुलविण्याचे काम या जलदूताने "भगीरथाने" केले आहे .अकोले तालुक्याच्या ओसाड जिरायत शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून बागायती बनवून शेकडो शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविण्याचे ऐत्यासिक काम मधुकरराव पिचड साहेबांच्या खात्यावर जमा आहे . पिचड दूरदृष्टीचा नेता शिक्षण, रोजगार, पाणी, रस्ते अशा प्रश्नांचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. आदिवासी विद्याथ्र्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. आश्रमशाळेचे जाळे संपूर्ण राज्यात विणून पिचड यांनी आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शरद पवार यांनी पिचड यांना आदिवासी विकास मंत्रीपदाची संधी दिली. आदिवासींचा स्वतंत्र अर्थसंकल्पही केला. बंद आंदोलन करून हक्काचे पाणी मिळविले. सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत निळवडे धरणाच्या घळभरणीचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांचा ठाम विरोध होता. त्यामुळे हे काम ठप्प झाले होते. या वेळी तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी नको होत्या, त्यांना हेक्टरी आठ लाख ८७ हजार ३०० रुपये दराने रोख स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. हे अनुदान स्वीकारण्यास बहुतेक खातेदारांनी मान्यता दिल्याने पुनर्वसन प्रश्नाची तीव्रता कमी झाली. प्रकल्पग्रस्तांना पाणी परवाने देण्याचेही मान्य करण्यात आले. एक जूनला पिचड यांचा वाढदिवस याच दिवशी निळवंडेच्या घळभरणीच्या कामास प्रारंभ झाला. धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. अकोल्याच्या इतिहासात नोंद व्हावी, अशीच ही बाब ठरली. या पाण्यामुळे राजूर- पिंपरकणे या रस्त्यांचा काही भाग धरणात बुडणार आहे. आदिवासी भागाचे केंद्र असणाऱ्या राजूर गावाशी असणारा १४ गावांचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे. हा संपर्क सुरळीत राहावा, यासाठी जलाशयावरून जाणारा उड्डाणपूल पिंपरकणे येथे बांधावा, अशी या गावातील लोकांची, तसेच प्रकल्पग्रस्तांचीही मागणी होती. मधुकरराव पिचड हेही यासाठी आग्रही होते. त्यामुळे सरकारने ३० कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी दिली आहे. प्रकल्प खर्चातूनच हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नांमुळे वाड्या वस्त्यांवर वीज पोचली. १३ मध्ये ५२ वाड्यांवर १ कोटी ५२ हजार, २०१३-१४ मध्ये ३० वाडयांना १ कोटी २९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राजूर येथील वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली या उपकेंद्रासाठी महसूल विभागाने जागाही हस्तांतरित केली आहे.या वीज केंद्रामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर सतत वीज मिळत असल्याने आदिवासी खुश आहेत.समशेरपूर, कोतूळ, सांगवी, पाडाळणे या उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली . पिचड यांना राष्ट्रवादी पक्षाने राज्याची जबाबदारी दिली होती. ही सर्व जबाबदारी संभाळून त्यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आदिवासींचे शोषण रोखून पारदर्शक पद्धतीने त्यांना विकासाची संधी देण्यासाठी पिचड यांनी निर्णयाचा धडाका सुरू केला. खावटी कर्जाची पद्धत बंद करून आदिवासींना बँकेच्या खात्यातून या कर्जाची रक्कम देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पिचड यांनी घेतला. तसेच, आदिवासी आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला. 'पिचड पॅटर्न' मधुकर पिचड यांनी राज्यात सुरू केल्याची भावना आदिवासी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना यापुढे सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे अपहाराला आळा बसला आहे. १९८० साली जिल्ह्यातील व तालुक्यातील पुढारी मधुकरराव पिचड यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र पिचड थेट दिल्लीला पोचले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. गांधींनी मुलाखतीत त्यांना आणिबाणीच्या काळात कुठे होता, असे विचारले, तेव्हा पिचड यांनी विसापूर जेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे तिकिट निश्चित केले. वसंतदादा पाटील यांनी पिचड यांना मंत्रीपदाची संधी दिली. भंडारदरा चाकबंद आंदोलनाच्या वेळी सरकारने त्यांच्यावर खटले भरले. ते खटले काढण्याचे काम वसंतदादा यांच्यामुळेच झाले.स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ओळख आहे . गेली चार दशके अकोल्याच्या सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , सहकार , शेती जीवनाशी एकरूप झालेले मधुकर पिचड ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहे मात्र शरीर थकले असले तरी मानाने ते थकलेले , खचलेले नाही आजारपणाशी ते यशस्वी लढा देत अकोल्याच्या समाज जीवनाशी ते आजही एकरूप आहेत कोव्हीड च्या काळात तालुक्यातील नागरिकांना , रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी ते बसल्या जागेवरून ते प्रयत्न करत आहेत .

Monday, May 24, 2021

वाडीत जायला रस्ता नाही..प्यायला पाणी ? तेही नाही. वीज कधी येते कधीही जाते

राजूर२४: एकविसाव्या शतकाकडे प्रवास करताना एका गावाची व्यथा ऐकल्यावर तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही वाडीत जायला रस्ता नाही..प्यायला पाणी ? तेही नाही. वीज कधी येते कधीही जाते रहिवासी अनामिक दहशतीखाली परतनदरा वाडीची ही करुण कहाणी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या अडचणीमुळे काही कुटुंबे शेतीवाडी सोडून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत .तालुक्यातील सत्तर वर्षे उलटूनही ही वाडी पिण्याच्या पाण्याची वाट पाहत आहे. तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीत तेथून तीन किलोमीटरवर परतनदरा वाडी आहे.पंचवीस घराच्या वाडीत सव्वाशे दिडशे लोक राहतात या ठाकर वस्तीवर विकासाची पहाट अद्याप उगवायची आहे ,रस्ता नसल्याने वाडीला कोणतेही वाहन जात नाही पाऊलवाटेने जावे लागते त्यात रस्ता अडविला जातो वाडीतील समस्या समजल्यानंतर . तनिष्का व्यासपीठ सदस्या शकुंतला खरात यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले मात्र आपल्या अडचणी सांगण्यासाठी पुढे कुणी येण्यास तयार नव्हते मात्र त्यांना विश्वास दिल्याने काही महिला व तरुण यांनी दबक्या आवाजात दादा आम्हाला ना रस्ता,ना पाणी ना स्वस्थ धान्य ना आदिवासी विकासाच्या योजना काटे कुटे तुडवीत तीन किलोमीटर वर कळंब गावात जावे लागते .अजून टँकर सुरू झाला नाही .तर विहिरींना पाणी नाही खडकाळ माळरानावर कसे तरी दिस काढतो . सध्या कोरोना महामारी आल्याने ना रोजगार ना खावटी,जंगलातील कवदर खाण्या शिवाय पर्याय नाही. २०१४ ला शासनस्तरावर पाठपुरावा केला मात्र अधिकारी वर्गाने कागदी घोडे नाचवून हा प्रश्न लाल फितीच्या कारभारमुळे तसाच दाबून ठेवला . ग्रामपंचायतीच्या तेथून ३ किलोमीटरवर पसनदी आहे कळंबसह परतनदरावाडीला चार वर्षांपूर्वी नळयोजना केली होती. ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. तिथी आजची परिस्थिती सांगता येणार नाही। - वसंतराव डोंगरे, उपअभियंता (लघुपाटबंधारे विभाग) महिलांना तासन् तास थांबून झऱ्यावरून तांब्याने पाणी भरावे लागते. रात्री पाणी भरायचे, दिवसा मजुरी... सध्या वाडीतील लोक ब्राह्मणवाडा आणि पिंपळदरी येथे मजुरीला जातात. कोणत्याही दिशेला जायचे, तर डोंगर तुडवावे लागतात. रात्रभर पाणी भरायचे आणि दिवसा मजुरीला जायचे, एवढेच रहिवाशांना माहीत. घरी कोणी नसल्यामुळे मुले कधीतरीच शाळेत जातात. वाडीसाठी अंगणवाडी बांधली; ती दूर असल्याने मुले जातच नाहीत. गावात सायंकाळी वीज येते आणि पहाटे जाते. बिबटे आणि तरस यांचा वावर नेहमीचाच. शेळ्या व इतर जनावरे घरात किंवा पडवीत बांधून त्यांच्याजवळच झोपावे लागते बचतगटही बंद झाला आशाबाई खंडे, भोराबाई खंडे, सुरेखा खंडे, कौशाबाई खंडे आदी ११ महिलांनी बचतगट सुरू केला; तोही बंद झाला. आदिवासी विकास विभाग दर वर्षी भाऊबीज अनुदान म्हणून महिला बचतगटाला १० हजार रुपये देतो. इथल्या महिलांपर्यंत ही योजना पोचलीच नाही. वाडीत शासनाचा व आदिवासी विकास विभागाचा एक पैसाही आजवर आला नाही. पंचायत समितीचे अधिकारीही कधी फिरकले नाहीत. परतनदरावाडीला लवकरच भेट देऊन प्रश्न समजून घेऊन ते तातडीने सोडवू. -संतोष ठुबे (आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी) २०१० ला वाडी साठी नळयोजना केली मात्र ती सुरू होण्यापूर्वी पाणीणीयोजना बंद आहे. रोजगार हमोतून रस्ता केला; तो फुटला आहे. श्रीमती शकुंतला खरात (उपसरपंच कळंब)

Thursday, May 20, 2021

कठ्याच्या यात्रेतला धगधगता थरार..! कोरोना च्या काजळी मुळे थांबला .... यात्रा रद्द

अकोले , ता . १४: डोक्यावर पेटलेले कठे, त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला, शरीरावर ओघळणारे उकळलेले तेल मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद, देवतांच्या नावाचा जयघोष संबळ, धोंदाना- पिपाणी, डफ, ताशा आदी पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने 'हाईईईई हाईईईई' असा लयबद्ध चित्कार करीत लोक बिरोबाचा गजर करीत आपले नवस फेडून संस्कृती जपतात मात्र या वर्षी कोरोना मुळे हि यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच भाऊराव भांगरे , उपसरपंच सुरेश भांगरे , मंदिर समन्वयक दत्ताभाऊ भोईर यांनी दिली केवळ पाच ग्रामस्थ मंदिरात जाऊन धार्मिक विधी व पूजन करणार असल्याचे ते म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांनी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे डोक्यावर पेटलेले कठे .... त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला ... शरीरावर ओघळणारे उकळते तेल ... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद ... बिरोबा दैवताचा नावाचा जयघोष ... संबळ , धोदाना -पिपाणी , डफ , ताशा अशा पारंपारिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने "हाई ,ह्हाई ,असे लयबद्ध चित्कार करत भाविक लोक बिरोबाचा गजर करतात , अक्षय त्रितीयेनंतर पहिल्या रविवारी गेली १०० वर्षांपासून बिरोबाची मोठी यात्रा भरते , त्यातून निसर्ग , परंपरा , संस्कृती असा त्रिवेणी संगम उपस्थितांना पाहायला मिळतो . खोल दरीत अतिदुर्गम असणारे आदिवासी कौठवाडी एक खेडे अनेक वर्षांची परंपरा जपत शिस्त बद्ध पद्धतीने बिरोबा देवाची यात्रा भरवते श्रद्धेने लाखो भाविक या यात्रेसाठी येतात ,महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्राउत्सव

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...