Wednesday, April 15, 2020

‘चला नाती जपु या’

इगतपुरी : मुलींनी शिक्षणात प्रगती करतांनाच आई-वडिलांना समाजात ताठ मानेने जगता येईल असे आचरण ठेवावे. त्यासाठी आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी मांडले.
तालुक्यातील घोटी येथील ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे यांच्या पुढाकारातून सामाजिक चळवळ म्हणून संताजी चौक येथे ‘चला नाती जपु या’ या अनुशंगाने रामतीर्थकर यांचे व्याख्यान झाले. ‘बदलती कुटुंबप्रणाली आणि काळाच्या ओघात एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना दुरावली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित झाल्याने प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा, असे आवाहन त्यांनी केले. घराबाहेर वडिलांची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर घरात आईने मुलीला संस्कारित केले पाहिजे. आपली संस्कृती पुरुषप्रधान असली तरी ती टिकविण्याचे कार्य स्त्रियांना करावे लागते. पूर्वी चुलीवर स्वयंपाक करायच्या, पाणी भरायच्या, सर्वच कामे करायच्या. तरीही घरात तक्रारी नव्हत्या. सध्या सोयी सुविधा वाढल्या. तशा तक्रारीही वाढल्या. प्रत्येक सुनेने आपणही सासु होणार याची जाणीव ठेवावी.’
‘सासुनेही ताठर भूमिका घेऊ नये. सद्यस्थितीत किरकोळ कारणांवरुन घटस्फोट होत आहेत. न्यायालयात भांडण जात आहे. त्यामुळे कुटुंबाच्या नातेप्रणालीत तडजोड ही भूमिका महत्वाची आहे. सर्वानीच दोन पावले माघारीची भूमिका घेतल्यास कौटुंबिक कलह निर्माण होणार नाहीत. शिक्षणाचा वापर महिलांनी आपल्या कुटुंबांच्या प्रगतीसाठी किती केला, याचा विचार करावा,’ असे आवाहन रामतीर्थकर यांनी केले.
प्रास्ताविक श्रीकांत काळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक विजय कर्डक यांनी केले. व्याख्यानास माजी आमदार शिवराम झोले, माजी उपसभापती रमेश काळे, सरपंच संजय आरोटे, माजी सरपंच इंदरचंद सुराणा आदींसह मोठय़ा प्रमाणावर गर्दी होती.
सिन्नर येथील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात ‘करोना’ विरोधात जागृती’साठी परिसरातून फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत या आजाराकडे लक्ष वेधले. गावात घराघरात जाऊन भित्तीपत्रक आणि फलक लावून याविषयी माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...