Sunday, July 5, 2020

घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन आज भंडारदरा परिसरात पाहायला



अकोले,ता.५: घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन आज भंडारदरा परिसरात पाहायला मिळाला [ Chameleon ] हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे . बरेचसे लोकं याचा उच्चार चमेलिओन असाही करतात. तर असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो नाहितर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपुर्ण भारतभर म्हणजे आसेतु हिमाचलपर्यन्त सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मिटर उंचीपासुन ते राजस्थानच्या ५० अं. वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात.

आपल्या परसदारातशेतोडीतजातायेता सहज दिसणार्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते नी ती सुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच! घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरु होतं. खडबडीत दिसणारं ह्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकंकडबोळ्यासारखी वळलेली शेपूटशरीराला न शोभणारे लुकडे पाय नी ज्युरासिक पार्क” पिक्चर मधल्या डायनोसार्स ची आठवण करुन देणारा याचा जबडा असं सुंदर ते ध्यानराहे फ़क्त झाडावरीच’! याचा कारण म्हणजे घोयरा क्वचीतच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदुच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या ह्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बिळ खोदुन त्यात अंडी घालते. आपण नेहेमी पहातो की आपल्या समोर दिसणारे सरडे अगदी तुरुतूरू पळत असतात. पण ह्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेतचाहुल घेत विचार करुन हा सरडा प्रत्येक पाउल टाकतो. जमिनीवर जी गोष्टतीच गोष्ट झाडावरपण.अगदी कुशल कसरतपटुप्रमाणे हा लवचीक फ़ांद्यांवरही मस्त हालचाली करतो. ह्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते नी ती म्हणजे याचं स्वत:च्या शरीरातल्या प्रत्येक स्नायुवर कमालीचा ताबा असतो. 
बरेचदा आपण जंगलात याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहू  शकतो . जे चपळपणे धावु शकत नाही ते स्वत:च वेगाने धावणारं भक्ष कसं पकडणार असा एक बेसिक प्रश्न कुणाच्याही मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काहीनाकाही तजवीज करुन ठेवलेली असते. घोयर्याची जिभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जिभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. घोयर्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकुच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकु स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फ़िरु शकतात. म्हणजे ह्याच भक्ष दिसलं की हा त्याचा अंदाज घेतोसावकाश शरीर पुढच्या पायावर तोलुन हळुच जबडा उघडुन थोडीच जिभ पुढे काढुन तयार रहतो.हे सगळं अगदी स्लो मोशन मधे सुरु असतं .sobat photo akl5p7







No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...