Sunday, August 23, 2020

बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.

 राजूर:-अकोले तालुक्यातील हरीचंद्र गडाच्या पर्वत रांगांत आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले शेवंतीचे मळे कोरोनामुळे कोमेजून गेले आहेत.फुलांची बाजारपेठच बंद असल्याने शेवंतीचे फुले झाडावरच सुकू लागली आणि आपल्या भात खाचरांत फुलशेती करणारा आदिवासी शेतकरी हवालदिल झाला.

     आजोबा पर्वतात उगम पावलेल्या मुळेचे पाणी छोटे मोठे पाझर तलाव व कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून तालुक्यात अडविण्यात आले.या खोऱ्यात मुळा बारमाही होऊ लागली आणि कुठे वीजपंप तर कुठे डिझेल इंजिनाच्या साहायाने हे पाणी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत खेळू लागले.जिरायत नंतर काय या प्रश्नाला उत्तर मिळाले आणि या परिसरातील शेतकरी आपल्या शेतांत भाजीपाला घेऊ लागला.
    प्रवरा खोऱ्यातील सधन शेतकऱ्यांचे अनुकरण करत आदिवासी शेतकरी भात पिकाची कापणी केल्यानंतर त्यात रब्बी आणि नगदी पिकांच्या जोडीला शेवंती आणि झेंडू या फुलांची शेती करू लागला.
    लावलेली ही फुलझाडे ऐन लग्न सराईत बहारायची त्यामुळे या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी होत असे .फुलशेती परवडण्यासारखी असल्याने वांजुळशेत,खडकी,लव्हाळी या परिसरातील अनेक शेतकरी  शेतात प्रामुख्याने शेवंतीची लागवड करत आहे.याच भागातील भाजीपाला वाहतूक करणारे ही फुले कल्याण मार्केटला नेत असत.
    यावर्षीही याच पट्ट्यात अनेकांनी शेवंतीच्या फुलांची लागवड केली होती.फुलांचे पीकही जोमाने आले.फुले निघण्याचीवेळ आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि फुलांची बाजारपेठ बंद झाली.स्थानिक फुल माळ्यांचीही दुकाने बंद झाली. त्यामुळे  एकही तोडा  न करता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेले या फुलांचे मळे सोडून दिले आहेत.
    चौकट:-प्रवरेच्या पट्ट्यात अनेक शेतकरी काही वर्षयंपासून फुलशेती करत आहे.लागवडी पासून तर फुले तोडण्यासाठी आमच्याच परिसरातील लोक रो�
Attachments area

bapu

 अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून वश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे व त्यांच्या सुविध्य पत्नी प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांचा आज लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक , अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ५० कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे . तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वाहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली २८ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने लग्न वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... सोमनाथ बनसोडे सर 

Friday, August 21, 2020

भाताच्या शेताची लावनी....

 भाताच्या शेताची लावनी....

    आज रविवार होता,शेतात गेलो होतो. जिकडे तिकडे भाताच्या लावनीची लगिन घाई सुरू होती.कोणी रोप काढत होते. कुठे यंत्रावर चिखल चालला होता .कुठे भाताची लागन चालू होती .सारं कसं शांत होतं .बैलाला ओरडल्याचा आवाज नाही.कूठं भलरी नाही, कुठं दुरडी नाही ,शेतात रोटर येत होता. शेत नांगरून चिखल करून जात होता .वावरात दोन तीन माणसंच दिसत होती.
मला माझा लहानपणीच्या भात लावनीची आठवन आली .उन्हाळ्यात पेर्ते व्हा ,पेर्ते व्हा.अशी  पावशी ओरडायला लागली की खऱ्या अर्थाने लावनीची सुगी सुरू व्हायची. शेतात नांगरनी सुरु व्हायची .तरवे लोटायचे ,शेतातला काटा कुटा वेचायचा. नंतर.बीयाचे भात स्वच्छ करायचे  निवडायचे भुईमुगाच्या शेंगा फोडायच्या. तो पर्यंत सुतार गावात हजर व्हायचा .नांगर ,कुळव, पाभार, भरायचा पिढी तयार करायचा. तोपर्यंत मिरग यायचा. शेतात धुळ वाफ्यावर मग भात पेरायचा. बाजारातून खतं आणायचा  उडीद काळे घेवडे आणायचे वाळवायचे भाजायचे भरडायचे कारण लावणीला उडदाचं गुठं आणि काळ्या घेवड्याची आमटी त्या काळी जीव की प्राण असायची.पाऊस पडला की  नाचनीला सुरवात व्हायची .वडपौर्णिमेला वड पुजला, की नाचनी आवटायला सुरवात व्हायची .कधी कधी नाचनी लाऊन माझी आई पोळ्या करायला घरी यायची.आणि तोपर्यंत झरं फुटलेले असायचे आणि भात लावनीला सुरूवात व्हायची. मग घरातला, भावकीतला, शेता जवळ शेत ,असलेल्या. बैलवाल्याच्या हंद्यात जायाचे .एक एका औताच्या मागे किमान दहा बारा माणसं. बायका लावायला असायच्या सकाळी तरवा काढायचा. तोपर्यंत औत्या शेत नांगरायचा.पाठाळं धरायचा . चिखल तयार व्हायचा, तरवा निघायचा. आम्हा लहान मुलांकडे रोप बांधाव काढायचे . चिखल झाला की परत वावरात फेकायचे काम असायचे .एवढ्या वेळात दुरडी यायची त्यात भात, हायब्रिडची भाकरी, उडदाचं गुठं ,कांदा असा बेत असायचा .कधी काळ्या घेवड्याची आमटी ,नाचन्याची भाकरी,  सुकट किंवा तळलेला बोंबिल असायचा. शिवाय बैलांना कणिकीचं गोळं, किंवा दोन दोन भाकरी असायच्या .अंगावर खोळ, त्याखाली पोतं, आणि मस्त पैकी अंगावर,ताटावर कालवनात  पडणारा पाऊस .याखाली जेवायचं आणि झऱ्याचं किंवा व्हळचं गोड पाणी  प्यायचं .आणि चिखलात उतरायचं. कोपरं लाऊन झालं की औत सुटायचं औत्या बैल धुवायला ओढ्यावर, नदीवर किंवा ओहळेवर जायाचा.मग इकडे भलरीला सुरवात व्हायची .
रायबाय गं जायबाय गं 
 तुझा दुलरी वाडा।
तुझ्या वाड्याला,वाड्याला
 तुझ्या खिडक्या चार।।
 भलरी तालात याची कोरभर वावार लाऊन व्हयाचं. तेवढ्यात ननंद भावजयांची जुगलबंदी व्हायची वहिनीला  घालून मग भलरी व्हायची.
वहीनी गं निजली जागी व्ह तरी गं।
लहु बाळाला लहु बाळाला वाळं आलं घे तरी गं ।।
 मग वहीनीलाही राग यायचा आणि ती म्हणायची 
आंब्याचं पान काय हिरवंगारं।
दादां वहीनी चिखल करं।
 दादाजी बैल जाऊद्या घरीं
नांगर खांद्यावरी।।
एवढ्यात ढापल्याला हुकी यायची पावड्यानं ढापलत ढापलत तो कारभारनीला चिढवत गायाचा.
 थड थड वाजतं। मठान शिजतं ।
हाडकानं दुखतय दाड गं सजने ।।
रस्सा रस्सा वाढ गं ।।
रस्सा रस्सा वाढ गं।।
 अशी भलरी गात गात वावार कधी लाऊन व्हायचं ते कळायचं नाही अंगात हुडहुडी भरलेली असायची. अंग आवतारायचं ,घरी यायचं दादांच्या (वडीलांच्या) पुढ्यात अंघोळ करायची. आणि भलरी गुणगुणत कधी झोप लागायची कळायचेच नाही.असं जवळ जवळ पंधरा ते तीन आठवडं चालायचं त्यात रविवारचा मोडा यायचा जातीवंत शेतकरी रवीवारी स्वतः औत ओढल पण बैल जुपायचा नाही. यातच बेंदुर यायचा बैल रंगवायचे सजवायचे. मिरवनूक काढायची. किती आनंद वाटायचा. शिवाय ज्याचं शिबं पडल त्याच्या घरी पुरण पोळ्या व्यायच्या सारा हंदा जेवायला यायचा किती आनंदी आनंद असायचा.
 पण आज हे सारं बदललय शेतकऱ्याची खरी दौलत असलेला बैल आज नामशेष झाला. सर्ज्या ,राज्या ,पठान, वजीर ,परधान ,ढवळ्या, पवळ्या सारे शेतकऱ्यांचे मित्र सोडून गेले .तो हंदा ती एकी संपली. ती भलरी, ती लोकगीतं नष्ट झाली. संध्याकाळी एखादा शेतकरी लावणीला मागे राहिला तर बांधावरनं जाणारा माणुस ,बाई शेतात वाकत होती. कुणाच्या घरी वाईट घडलं, तर सारा गाव त्याच्या शेतात जाऊन लावनी करून देत असायची. हे सारं सारं संपलं. आज कोण कोणाच्या शेतात जाईना, मदत करेना, इतकंच काय पण जो भात खातोय तो मुंबईला. आणि ज्याला चालाय येत नाही ते म्हातारे आईवडील शेतात राबताना दिसत आहेत. जाऊद्या उद्या बेंदुर येईल. पण त्या दिवशी पुजायला गावात बैल दिसनार नाही.पण त्या दिवशी कोणाला ना कोणाला तरी या लावनीची आणि तिच्या साठी शेतकऱ्या साठी नि स्वार्थी पणे राबणाऱ्या ढवळ्या, पवळ्याची आठवण मात्रं नक्की येईल एवढं मात्र नक्की.
                    बळवंत पाडळे

Wednesday, August 19, 2020

RAGHOJI BHANGARE

 

Tuesday, August 4, 2020

माणसातील देव मला भेटले

माणसातील देव मला भेटले-चिमणी आपले घरटे तयार करते पण तिचे घरटेही काही जण पडण्याचा प्रयत्न करतात मात्र गरूडरूपी पक्षी तिचे ते घरटे वाचवतो तसेच काहीसे माझ्याबाबतही घडले समाजविघातक मंडळींनी एकत्र येत एक लाचखोर पोलिसाला हाताशी धरून माझे चिमुरड्या मुलांचे ज्ञानरुपी घरटे उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ,माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझी लेखणी हिसकावून घेतली त्यात ते काही अंशी यशस्वी झालेही असतील मात्र समाजात अजूनही काही  देव माणसे असल्याने मी त्यातून सावरलो तर सकाळचे कार्यकारी संपादक ऍड बाळासाहेब बोठे पाटील हे माझ्यामागे खंबीर पणे उभे राहिले माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला मला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळाली ,माझ्या आयुष्यात  ऍड,बाळासाहेब बोठे साहेब प्राचार्य प्रकाश टाकळकर सर,ऍड नितीन जोर्वेकर ,यांनी  मला अडचणीच्या काळात साथ केली ,ही देव माणसे माझ्या आईवडील इतकेच माझ्या जन्मोजन्मी हृदयात आहेत व यापुढेही राहतील असे  भावनिक मत शांताराम काळे यांनी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला व्यक्त केले सुमारे दोन तपाच्या पत्रकारीते नंतर गत वर्षी जानेवारी महिन्यात अकोले तालुका प्रतिनिधी म्हणून सकाळमध्ये दाखल झालो आणि पत्रकारितेचे एक वेगळेच विश्व माझ्यासाठी खुले झाले सकाळच्या संपादकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतानाच सकाळच्या सामर्थ्याची प्रचीती येऊ लागली विविध प्रकारच्या प्रश्नांना विशेषता उपेक्षित वंचित माणसां संदर्भातील बातम्यांना सकाळमध्ये मिळणारे स्थान त्याचा समाजमनावर होणारा परिणाम या बाबी लक्ष्यात आल्या आमचा अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम डोंगराळ इथल्या माणसांचा जीवनसंघर्ष त्यांचे दु:ख , व्यथा , वेदना मांडण्याची त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची संधी सकाळ मुळे मिळाली माझ्या दीड वर्षातील काळातच मनात घर करून राहतील असेही ते म्हणाले


    अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास  असल्याने त्यांच्याच नावाने  1992 साली 

श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.संस्था स्थापनेसाठी कै.राघवराव पवार,कै.रमेश आरोटे,मिलिंद उमराणी, जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,एम.के.बारेकर,नंदकुमार बेल्हेकर,सुमंत वैद्य,हबीब मणियार,शशिकांत ओहरा,देविदास शेलार,श्रीराम पन्हाळे ,चंद्रकांत बांगर यांनी बहुमोल मदत केली.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात  मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. संस्था पदाधिकारी ,ग्रामस्थ व पालक यांची खंबीर साथ असल्याने ज्ञानदानाचा हा यज्ञ अविरतपणे चालु राहिला. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी  रात्रंदिवस ध्यास घेऊन  विविध  अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान  महिला यांची व्याख्याने आयोजित करून  विद्यार्थ्यांमध्ये  सकारात्मक प्रेरणा  भरण्याचे काम  अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत  होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो.

सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा  सत्कार्याचा वसा  पुढच्या पिढीला  समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे.

       कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि  बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली  मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम.

       तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा  विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे.  

    नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे   पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध  वाचा फोडणारा हक्काचा  माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख  निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे.

     माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.

काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..!

म्हणूनच  आपणास

 वाढदिवसानिमित्त  आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा


आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...