Friday, April 17, 2020

*मनुष्यप्राणी घरात बंद आणि पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असे दुर्मीळ चित्र शहर व परिसरात *




अकोले , ता . १७:आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे .... असे गाणे गुणगुणत पशु पक्षी आकाशात  विहार करताना दिसत आहे,भंडारदरा,घाटघर,रतनवाडी,कळसूबाई,हरिसचंद्रगड अभ्यरण्यात यावर्षी मुबलक पाणी व चारा असल्याने व कोरोना व लॉकडाऊन मूळे मानव प्राणी घरातच बंद तर पशु पक्षी आनंदी गाणे गुणगुणत या झाडांवर तर त्या डोंगर कपारीत बसून आपले दिवस कुही कुही .. मंजुळ स्वराने एकमेकांना साद घालत आपल्या आविष्काराने निसर्गाच्या आविष्काराला न्हाहळत त्याच्या सानिध्यात घालवत आहे .वनविभागाने संपूर्ण बंदी घातल्याने पर्यटक या भागात फिरकत नाही .प्रदूषणाचा लवलेश नसलेली मोकळी स्वच्छ हवा, मर्यादित मानवी हस्तक्षेप आणि शांत, सुंदर, मोकळा अधिवास असे आल्हाददायक वातावरण अनुभवणारे पशुपक्षी निसर्गप्रेमींना सुखद धक्का देत आहेत. करोना विषाणू प्रतिबंध म्हणून पाळण्यात आलेल्या बंदमुळे समस्त मनुष्यप्राणी घरात बंद आणि पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असे दुर्मीळ चित्र शहर व परिसरात सध्या पाहायला मिळत आहे.शेतशिवारात गेलेले पक्षी हे टाळेबंदीच्या अवघ्या २१ दिवसांत पुन्हा मानवी वस्तीजवळ परतून आले आहेत.  त्यामुळे आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने पुन्हा दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे देशात कडकडीत बंदची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास परवानगी नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान, बेरोजगारी यांसारखी संकटे आहेतच, मात्र करोना विषाणू संसर्गाचा सकारात्मक पैलू म्हणून वन्यजीवांचा मुक्त संचार ही एकमेव बाब समोर आली आहे.  वनविभाग आणि निसर्ग सवांद यांचे   कॅमेऱ्यात पशू-पक्ष्यांचा हा मोकळा वावर कैद करण्यात आला आहे. त्यांमध्ये धनेश, भारद्वाज, स्वर्गीय नर्तक, सातभाई, शिंपी,तिबोटी खंड्या, किंगफिशर 
 
 घुबड असे पक्षी तर माकड ,लांडगा, कोल्हा, वानर ,मोर ,ससा  , मुंगूस असे प्राणी आढळून आले आहेत.

 सक्तीचे घरी राहणे माणसांसाठी कितीही कंटाळवाणे असले तरी पश-पक्षी मात्र या परिस्थितीचा आनंद लुटताना दिसत आहेत. गावात व  परिसरात कावळे, कबुतरे असे मोजके पक्षी दिसतात. चिमण्यांचे दर्शन देखील दुर्मीळ असते. माणसांचा वावर कमी झाल्यानंतर सोसायटीच्या गच्चीवर घुबड आश्रयाला येत आहेत. मोकळ्या बागांमध्ये भारद्वाज पक्षी बागडताना दिसत आहेत. धनेश पक्षी घराच्या खिडक्यांपर्यंत येत आहेत. हा बदल आल्हाददायक आहे. माणसांना, मुलांना निसर्गाच्या जवळ नेणारा आहे.कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा वन परिक्षेत्रामध्ये भंडारदरा धरण व घाटघर उदंचन प्रकल्पासारखे मोठे पाणवठे असून या वर्षी मुबलक प्रमाणात पावसाने या अभयारण्यावर प्रसन्नता दाखविल्याने वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही.  वन्य प्राण्यांच्या प्रगणनेमध्ये या अभयारण्यात प्राणी व पक्षांची संख्या वाढल्याचे दिसून आले

शहरांबरोबरच ग्रामीण भागात वन्यजीवांच्या हालचाली कशा आहेत हे पाहण्यासाठीनिसर्ग सवांद फाउंडेशन आणि वनविभागाने लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यांची मदत झाली आहे. पाणवठय़ांवर येणाऱ्या प्राण्यांची वर्दळ वाढली आहे. बिबटय़ा, रान मांजरे, कोल्हे, लांडगे, मुंगूस यांच्या हालचाली मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. .  सोबत फोटो akl १७प ४,५,६,७,८,९,अत्यंत सुरेख प्रतिमा मिळालेला क्षण म्हणजे हा तिबोटी खंड्या ... भारतात खंड्याच्या १२ जाती आहेत ... त्यातला हा खंड्या सगळ्यात सुंदर आहे छाया किशोर जोशी 








No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...