Friday, May 1, 2020

ममता मावशीचा शेकडो चिमन्यासाठी नैसर्गिक मंडप




अकोले ,ता . २:-धकाधकीच्या जीवनात माणूस माणसाकडे बघत नाही ,विचारपूस करत नाही , एकमेकांना वेळही देत नाही , काळजी करत नाही .याला अपवाद आहेत अकोले तालुक्यातील देवगावच्या फूड मदर  ममताबाई देवराम भांगरे .   देश आणि विदेशात फूड मदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना जीव लावतात . घरी आलेल्या प्रत्येकाला त्या आपलस करून टाकतात .त्यांनी उभारलेल्या अंगणात नैसर्गिक मांडवात  रोजचे शेकडो पाहुणे येतात .तुम्ही जरा विचारात पडला असाल की, रोजचे शेकडो पाहुणे कश्यासाठी बर येत असतील ममतामावशींकडे .           हो रोजचं येतात आणि अगदी मुक्कामी येतात कारण त्यांना हवी असलेली मायेची ऊब ममता मावशींच्या घरात त्यांना मिळते .       एकही दिवस चुकत नाही या पाहुण्यांचा असे कोण बर असतील हे पाहुणे ? निसर्गातून आपल्या अंगणातून नामशेष होत चाललेली चिऊ ताई म्हणजेच चिमणी . हो याच  चिमण्या शेकडोंच्या संख्येने येतात.तर पारवे , साळुंखी ,कोकिळा ,भार्गव  मावशींकडे रोज मुक्कामी आणि अगदी हक्काने आणि खात्रीने   . कारण मावशी आपल्या घरच्या सदस्यांना स्वयंपाक करण्यागोदर सोय करतात. या त्यांच्या लाडक्या चिमण्यांची. व पाखरांची         त्यांना लागणारे खाद्य त्या अगोदर ठरलेल्या जागी नेऊन ठेवतात, आणि पिण्यासाठी भरपूर पाणीही . या चिमण्या इतक्या लाडक्या झाल्या आहेत की, मावशी जणू काही त्यांची आईच अगदी तिच्या जवळ येऊन तिच्याशी लाड घालणार. मुळातच ममता मावशीं वाढली ती ग्रामीण भागात आणि त्यातून शेतकरी कुटुंबात . लहानपानापासून तिला आई वडिलांकडून प्राणीमात्रांवर दया करावी त्याना आपल्या घासतील घास भरवावा हे संस्कार झाले. तिच्या माहेरीही मुक्या प्राणी आणि पक्ष्यांना आई नेहमी सकाळी-सकाळी दाणे आणि पाणी भरून ठेवायची . हेच संस्कार आणि विचार तिने सासरी म्हणजे सध्या राहत असलेल्या देवगावात नेले. तिचे विचार एकल्यावर माणूस म्हणून जगताना कसे जगावे हे समजल्याशिवाय राहत नाही. तिने अंगणात भला मोठा झाडं-वेलींचा मांडव घातला आहे का माहीत आहे . कुणीही पाहुणा आला की त्याला या मांडवात विसावा घेता यावा आणि पक्ष्यांना बसायला आणि विसावा घ्यायला हक्काची जागा मिळावी म्हणून .खरच किती महान विचारांची माणसं आजही या जगात आहेत.   चौकट- एकदा उभ्या पिकात मोकाट ढोर शिरलं,मी तिला विचारलं कुणाचं आहे,आपली आहे का?त्यावर तिनं उत्तर दिलं, कुणाच हाय ते माहीत नाही.पण पक्क भुकेलं दिसतंय,खाउद्या काय खायचे त्याला. मूक आहे बिचारं. मी विचार केला, मावशीच्या जागी कुणी दुसरं असत तर मोठा आरडाओरडा केला असता.आणि ज्याम शिव्या हसडल्या असत्या.आणि वरून त्या मुक्या जनावराला बदडल  असते.यावरून मावशीच्या मनाचा अंदाज व मोठेपणा जाणवला.              स्वार्थांनी भरलेल्या जगात आपल्या वेगळ्या विश्वात रमणारी माणसही आहेत जगात . कुठलीही अपेक्ष न करता त्या हे सर्व करतात. फक्त आत्मिक आनंद मिळविण्यासाठी आणि तो आनंद दिसतोही अगदी त्यांचा वागण्यात आणि कृतीतून .                          जितीन साठे, नाशिक विभागीय अधिकारी, बायफ, नाशिक सोबत फोटो akl २p २,३
Attachments area

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...