Saturday, May 16, 2020

तालुक्यातील टोमॅटो पिकाला गूढ व्हायरस झाल्याने एक हजार एकर क्षेत्रात टोमॅटो खराब झाले असून सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज टोमॅटो शेती क्षेत्रातील तज्ञ व्यक्त

राजूर  , ता . १६:तालुक्यातील टोमॅटो पिकाला गूढ व्हायरस झाल्याने एक हजार एकर क्षेत्रात टोमॅटो खराब झाले असून सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज टोमॅटो शेती क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत . टोमॅटो बियाणे कंपनी व कृषी विभाग यांचा समन्वय नसल्याने तसेच कृषी विधापीठाने नमुने बॅंगलोरला पाठवून वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी महेश नवले , विलास भांगरे आदी दहा शेतकऱ्यांनी केला आहे.
कोरोनामुळे भाजीपाला भाव घेतले असून त्यात टोमॅटो व्हायरस मुळे टोमॅटोचा रंग बदलतो कडकपणा जातो व फळ आपोआप खराब होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे . झाडावर रोग कि बियाणे खराब याबाबत शंका असून कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी मंगळवारी खास गाडी करून कृषी आयुक्त यांची विशेष परवानगी घेऊन बेंगलोर येथे तपासणीसाठी मंगळवारी पहाटे ६ वाजता खास वाहनाने पाठविण्यात आले आहेत. ते रात्री ९. १५ वाजता पोहचले असून मंगळवारी त्याचा रिपोर्ट येणार आहे. अकोले येथील शेतकरी महेश नवले यांचे चार एकर तर तांभोळ येथील विलास भांगरे यांची साडेसात एकर अश्या ४०० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यामुळे राहुरी कृषी विधापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ . एस व्ही कोळसे , डॉ विवेक शनिदे डॉ अनिकेत चंदनशिवे , यांच्या पथकाने प्लॉटला भेट देऊन नमुने बॅंगलोर ला पाठविले आहे विलास काशिनाथ भांगरे मु.पो. तांभोळ ता. अकोले जि. अहमदनगर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये सिजेंटा कंपनीचे '१०५७' आणि सेमिनिस कंपनीचे 'आयुष्यमान' या दोन हायब्रीड वाणांची लागवड माझ्या शेतामध्ये केली होती. यावर्षी दरवर्षीप्रमाणेच टोमॅटोचे प्लॉट अतिशय सुंदर व निरोगी आले. परंतु टोमॅटो सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये फळावर वेगवेगळे डाग, तिरंगा लूज पडणे या समस्या जाणवायला लागल्या. त्यानंतर मी कंपनी प्रतिनिधीशी संपर्क केला कंपनी प्रतिनिधींनी टोमॅटोचे सॅम्पल बंगलोर येथील संशोधन लॅबमध्ये पाठवले परंतु त्याचे रिपोर्ट मात्र आम्हाला दिले नाही त्यांनी आम्हाला कंपनी गोपनीयतेचे कारण सांगितले. त्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांचेकडे सामूहिक व वैयक्तिक निवेदने दिली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन लॉक डाऊन असतानाही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम आमच्या शेतामध्ये पाहणीसाठी आली. परंतु त्यांचेही रिपोर्ट आले नाही त्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला तेव्हा असे समजले पुन्हा एकदा टोमॅटोचे आणि बियाण्याचे सॅम्पल बंगलोरला पाठवले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच तुम्हाला रिपोर्ट मिळतील वास्तविक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नामवंत कृषी विद्यापीठ आहे. आणि तेथे टोमॅटोच्या वाणांना परवानगी देताना ट्रायल घेतल्या जातात सदर विद्यापीठात मोठमोठे शास्त्रज्ञ असताना. त्यांनी पाहणी केल्यानंतर ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसतील तर मात्र शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण होतो.यात कंपनी व अधिकारी यांचा दुर्लक्ष्यपण आहे तर महेश नवले यांनीही याला दुजोरा दिला आहे . सरकारने संबंधित कंपनी व कृषी विभाग यांचेकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे म्हटले आहे नमस्कार,मी महेश नवले आगार गावातील टोमॅटो उत्पादक शेतकरी असून मी गेली अनेक वर्षापासून अत्यंत आधुनिक पद्धतीने टोमॅटोची शेती करीत आहे. मझ्या वडिलांनी १९८४ पासून १९९८ पर्यंत जुन्या देशी वाणांची टोमॅटोची शेती केली त्यामध्ये गोलटा, मदनफल्ली, चमेली, मोगरा यासारखे त्याकाळातील टोमॅटोचे वाण पिकवले, नंतरच्या कालखंडामध्ये १९९९ साली मी स्वतः नामधारी कंपनीचे उस्तव, १८१२, १८१५ या सुधारित वाणाचे उत्पादन घेतले. त्यानंतर सिंघाता कंपनीचे अभिनव, अविनाश, अविनाश २ ही नवीन वाणाचे उत्पादन घेतले. सिंजेटा व सेमिनिज या कंपनीचे सध्या माझ्या ४ एकर श्रेत्रामध्ये टोमॅटो उत्पादन चालू आहे. माझ्या टोमॅटो लागवडाचा हंगाम हा दरवर्षी १५ फेब्रुवारी ते ३० मार्च ह्यादरम्यान निश्चित ठरलेला असतो. सुधारित तंत्रज्ञानानुसार ह्यागोष्टी करणे गरजेजे आहे शेणखतापासून ते जैविक तंत्रज्ञानापर्यंत असे सर्व प्रयोग आम्ही दरवर्षी आमच्या शेतात करत असतो. त्यामुळे आम्हाला दरवर्षी भरघोस उत्प्पन मिळत होते. ह्यावर्षी तोच प्रयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांनी अगदी ठरलेल्या वेळेत अत्यंत कुशलतेने प्रयोग केला. टोमॅटोच्या झाडांची गुणवत्ता एकूण आमचे व्यवस्थापन यामुळे टोमॅटो बांधणी होईपर्यंत प्लॉट अत्यंत सुंदर अवस्थेत उभे होते परंतु , जेव्हा फळे काढणीला आले तेव्हा मात्र फळांची अवस्था व रंग बघता हे फळे खाण्यायोग्य नाही हे लक्षात आले आणि बघता बघता एका आठवड्यामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये फळे खराब झाली. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि राज्य सरकारच्या कृषी विभाग प्रत्यक्ष पाहणीला आले नंतर बियानामध्ये व्हायरस आलेले आहे अशा प्रकारच्या चर्चा करू लागले. परंतु आमचे म्हणने असे आहे की, अशा प्रकारच्या टोमॅटोच्या रोगग्रस्त असल्याची ही पहिली वेळ नाही. ह्यापूर्वी देखील अनेक वेळा अशा प्रकारच्या रोगाची झाडे प्लॉट मध्ये असायची पण त्याचप्रमाणे एकूण झाडांच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजे १ % असायचे त्यामुळे शेतकरी ह्याकडे दुर्लक्ष करायचा. आमच्या शेतकऱ्यांच्या अनुभवा अंती असे म्हणतो आहे की एखादी टोमॅटोचा नवीन वान बाजारात आल्यानंतर त्या वाणाचा व्हरायटीचा टाइम पिरीयड हा ३ ते ४ वर्षाच्या पुढे टिकत नाही याची अनेक उदाहरणे आहेत ह्या कंपनीच्या काळानुसार आम्ही केलेल्या अनेक वाणाच्या प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे. आमचे म्हणणे हेच आहे की मल्टीनेशनल कंपनीच्या बियाण्यांची दरवर्षी विभागप्रमाणे त्याची ट्रायल होणे अपेक्षित आहे. जर ती ट्रायल विभागाप्रमाणे व हंगामाप्रमाणे गेली असती तर आज ह्या हंगामामध्ये महाराष्ट्रात जेवढे टोमॅटो उत्पादक शेतकरी ह्या यंत्रणेच्या चुकीमुळे आज संकटात आहेत याला जबाबदार राज्याचे कृषी मंत्रालय, कृषी आयुक्त व कृषी विद्यापीठ हेच जबाबदार आहेत.याचे कारण बेंगलोर, आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागात ह्यामध्ये रब्बी मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर ज्या टोमॅटोच्या लागवडी झाल्या त्यामध्ये हा व्हायरस आढळून आला होता. जर कृषी विद्यापीठ व कृषी आयुक्त यांनी ह्याची दखल घेतली असती मल्टीनेशनल कंपनीच्या बियाणे विक्रीस प्रतिबंध घातला असता व शेतकऱ्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले असते तर आज संपूर्ण शेतकरी वाचला असता. त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की राज्याचे कृषी विभाग, विद्यापीठ व मल्टीनेशनल कंपन्या कारवाई करावी व सर्व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आहे.
प्रवीण गोसावी ( तालुका कृषी अधिकारी )- तालुक्यात टोमॅटो व्हायरस मुळे शेत करी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून याबाबत तातडीने पाऊले उचलून महात्मा फुले कृषी विधापीठ राहुरी येथील वैज्ञानिक दोन वेळा आणून शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन पाहणी केली दुसऱ्या वेळी बियाणात दोष , झाडात दोष कि फळात दोष याबाबत बियाणे , झाडाची फांदी , केमिकल , फळे याचे नमुने वातानुकूलित बॉक्स मध्ये घेऊन तसेच कृषी आयुक्त यांची विशेष परवानगी घेऊन बेंगलोर येथे तपासणीसाठी मंगळवारी पहाटे ६ वाजता खास वाहनाने पाठविण्यात आले आहेत. ते रात्री ९. १५ वाजता पोहचले असून मंगळवारी त्याचा रिपोर्ट येणार आहे मात्र टोमॅटो खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो या अफवा असून कोणताही आजार होत नसून त्या अफवा त्वरित थांबवाव्यात .
वैभव पिचड (माजी आमदार )- तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कृषी आयुक्त व जिल्हाकृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू न बंगलोर येथील नमुना तपासणी अहवाल त्वरित आणून व पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली असूनयाबाबत तातडीने पंचनामे करून व खते बियाणे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
अजित नवले (माकप )
टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.
वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे.फोटो akl १६p ३,६,७












No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...