Sunday, July 5, 2020

घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन आज भंडारदरा परिसरात पाहायला



अकोले,ता.५: घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन आज भंडारदरा परिसरात पाहायला मिळाला [ Chameleon ] हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे . बरेचसे लोकं याचा उच्चार चमेलिओन असाही करतात. तर असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो नाहितर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपुर्ण भारतभर म्हणजे आसेतु हिमाचलपर्यन्त सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मिटर उंचीपासुन ते राजस्थानच्या ५० अं. वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात.

आपल्या परसदारात, शेतोडीत, जातायेता सहज दिसणार्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते नी ती सुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच! घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरु होतं. खडबडीत दिसणारं ह्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी “ज्युरासिक पार्क” पिक्चर मधल्या डायनोसार्स ची आठवण करुन देणारा याचा जबडा असं ’सुंदर ते ध्यान, राहे फ़क्त झाडावरीच’! याचा कारण म्हणजे घोयरा क्वचीतच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदुच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या ह्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बिळ खोदुन त्यात अंडी घालते. आपण नेहेमी पहातो की आपल्या समोर दिसणारे सरडे अगदी तुरुतूरू पळत असतात. पण ह्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहुल घेत विचार करुन हा सरडा प्रत्येक पाउल टाकतो. जमिनीवर जी गोष्ट, तीच गोष्ट झाडावरपण.अगदी कुशल कसरतपटुप्रमाणे हा लवचीक फ़ांद्यांवरही मस्त हालचाली करतो. ह्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते नी ती म्हणजे याचं स्वत:च्या शरीरातल्या प्रत्येक स्नायुवर कमालीचा ताबा असतो. 
बरेचदा आपण जंगलात याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहू  शकतो . जे चपळपणे धावु शकत नाही ते स्वत:च वेगाने धावणारं भक्ष कसं पकडणार असा एक बेसिक प्रश्न कुणाच्याही मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काहीनाकाही तजवीज करुन ठेवलेली असते. घोयर्याची जिभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जिभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. घोयर्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकुच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकु स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फ़िरु शकतात. म्हणजे ह्याच भक्ष दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलुन हळुच जबडा उघडुन थोडीच जिभ पुढे काढुन तयार रहतो.हे सगळं अगदी स्लो मोशन मधे सुरु असतं .sobat photo akl5p7







Saturday, June 27, 2020

खायला भाकर नाही, मोबाईल कोठून आणू?करोनाच्या संकटानंतर एका बाजूला शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू

 खायला भाकर नाही, मोबाईल कोठून आणू?करोनाच्या संकटानंतर एका बाजूला


शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू 

 राजूर  , ता . २९:करोनाच्या संकटानंतर एका बाजूला शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू असताना आदिवासी भागातील बालके शिक्षणापासून आणखी दूर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता नसलेला हा वर्ग नव्याने येऊ घातलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या चर्चेमुळे पुरता गांगारून गेला आहे. खायला भाकरी नाही, तर मोबाईल कोठून आणयचा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.


आदिवासी भागातील मुलांना शाळेत आणणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान असते. त्यामुळे करोनाचे संकट असले तरी अकोले तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक आदिवासी पाड्यांवर जाऊन मुले आणि पालकांचे शिक्षणासंबंधी प्रबोधन करीत आहेत. मोफत पुस्तक योजतील पुस्तके त्यांच्या हाती देत आहेत. त्याचवेळी ऑनलाइन शिक्षणाचाही मुद्दा चर्चेत येत आहे. आधीच शिक्षणाबद्दल नकारात्मक असलेले गरीब आदिवासी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पुस्तके दिली खरी पण शाळा केव्हा सुरू होणार, हे शिक्षकही सांगू शकत नाहीत.

'शाळा भरणार असेल तर मुलांना घेऊन जा, तुम्हीच काय करायचे ते ठरवा, पण ऑनलाइन शिक्षण आम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा गुरे-ढोरे सांभाळून कामात मदत करतील,' अशी उत्तरे पालकांकडून मिळत आहेत. करोनाबद्दलही त्यांच्या मनात भिती आहे. 'रोग दूर झाला नाही, तर आम्ही मुलांना शाळेत पाठविणारच नाही. तुम्हीच वस्तीवर येऊन शिकवा,' असेही काही पालक शिक्षकांना सांगत आहेत.


अशा प्रश्नांचा सामना करीत, दुर्गम भागात पायपीट करीत शिक्षक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटत आहेत. निळवंडे धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी ठाकर समाजाला आपल्या उर्वरित जागेत वस्ती करून राहावे लागत आहे. रोजच्या जगण्यासाठी धडपड करताना त्यांच्या डोक्यात तर मुलांच्या शिक्षणाचा विचारही नाही. 'शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणाला लागलेली असताना आदिवासी भागातील मुले शेळ्या-मेंढ्या सांभाळण्याचे काम करीत आहेत. शाळा असती तर कसे का होईना त्यांना शाळेत आणता आले असते,' असे शिक्षक सतीश काळे यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच श्रीनिवास मुळे, किरण भागवत यासह अनेक शिक्षक सध्या वाड्यावस्त्यांवर फिरून विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधत आहेत.

आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी आम्ही या भागात शाळा सुरू केली. आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. यावर्षी करोनामुळे चित्र बदलले आहे. लॉकडाउनच्या नियमामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. शिवाय यापुढे अनेक नवे नियम असणार आहेत. अशा परिस्थिती या आदिवासी मुलांना सांभाळणे हे आमच्यासाठी आव्हान असणार आहे. तसेच त्यांनाही जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.


मंजुषा काळे, मुख्याध्यापक, स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले 

अकोले , ता . २८:करोनाच्या संकटानंतर एका बाजूला शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू असताना आदिवासी भागातील बालके शिक्षणापासून आणखी दूर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता नसलेला हा वर्ग नव्याने येऊ घातलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या चर्चेमुळे पुरता गांगारून गेला आहे. खायला भाकरी नाही, तर मोबाईल कोठून आणयचा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.


आदिवासी भागातील मुलांना शाळेत आणणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान असते. त्यामुळे करोनाचे संकट असले तरी अकोले तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक आदिवासी पाड्यांवर जाऊन मुले आणि पालकांचे शिक्षणासंबंधी प्रबोधन करीत आहेत. मोफत पुस्तक योजतील पुस्तके त्यांच्या हाती देत आहेत. त्याचवेळी ऑनलाइन शिक्षणाचाही मुद्दा चर्चेत येत आहे. आधीच शिक्षणाबद्दल नकारात्मक असलेले गरीब आदिवासी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पुस्तके दिली खरी पण शाळा केव्हा सुरू होणार, हे शिक्षकही सांगू शकत नाहीत.

'शाळा भरणार असेल तर मुलांना घेऊन जा, तुम्हीच काय करायचे ते ठरवा, पण ऑनलाइन शिक्षण आम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा गुरे-ढोरे सांभाळून कामात मदत करतील,' अशी उत्तरे पालकांकडून मिळत आहेत. करोनाबद्दलही त्यांच्या मनात भिती आहे. 'रोग दूर झाला नाही, तर आम्ही मुलांना शाळेत पाठविणारच नाही. तुम्हीच वस्तीवर येऊन शिकवा,' असेही काही पालक शिक्षकांना सांगत आहेत.


अशा प्रश्नांचा सामना करीत, दुर्गम भागात पायपीट करीत शिक्षक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटत आहेत. निळवंडे धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी ठाकर समाजाला आपल्या उर्वरित जागेत वस्ती करून राहावे लागत आहे. रोजच्या जगण्यासाठी धडपड करताना त्यांच्या डोक्यात तर मुलांच्या शिक्षणाचा विचारही नाही. 'शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणाला लागलेली असताना आदिवासी भागातील मुले शेळ्या-मेंढ्या सांभाळण्याचे काम करीत आहेत. शाळा असती तर कसे का होईना त्यांना शाळेत आणता आले असते,' असे शिक्षक सतीश काळे यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच श्रीनिवास मुळे, किरण भागवत यासह अनेक शिक्षक सध्या वाड्यावस्त्यांवर फिरून विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधत आहेत.

आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी आम्ही या भागात शाळा सुरू केली. आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. यावर्षी करोनामुळे चित्र बदलले आहे. लॉकडाउनच्या नियमामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. शिवाय यापुढे अनेक नवे नियम असणार आहेत. अशा परिस्थिती या आदिवासी मुलांना सांभाळणे हे आमच्यासाठी आव्हान असणार आहे. तसेच त्यांनाही जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.


मंजुषा काळे, मुख्याध्यापक, स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अको

दिवाळी आली, तरी घरं सारवली जात नाहीत!

दिवाळी आली, तरी घरं सारवली जात नाहीत! अकोल्याच्या मातीचा सुगंध हरवला; शेणामातीच्या सारवणासोबत जुन्या आठवणी, परंपरा आणि माणसांमधील ओलावाही ...