Thursday, April 30, 2020

आदिवासी समाजात फुट पाडण्याचे हे सुपीक डोके कुणाचे -आदिवासी पुन्हा जंगलात जाऊन कंदमुळे खाणार का ?




आदिवासी समाजात फुट पाडण्याचे हे सुपीक डोके कुणाचे -आदिवासी पुन्हा जंगलात जाऊन कंदमुळे खाणार का ?----
अकोले ता . २९:आदिवासी समाजाला रोजगार नाही उपासमारीची वेळ आली असल्याने  आदिवासी विकास महामंडळाने खावटी धान्य देण्यास सुरुवात केली तर अनुसूचित जमातीतील ४७ पैकी कातकरी कोलाम व माडिया कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना धान्य वाटप होणार आहे मात्र इतर आदिवासींना त्याचा लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे व आदिवासी समाजात फुट पाडण्याचे सुपीक डोके कुणाचे त्यामुळे  राज्यातील आदिवासी समाज संभ्रम अवस्थेत आहे . कोविड १९ उध्दभवल्याने राज्यातील आदिवासींना रोजगाराला मुकावे लागले असून जर पोटात घास गेला नाही तर पुन्हा जंगलात जाऊन कंदमुळे खाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे आदिवासी विभागाने हा निर्णय बदलून सर्वांचा त्यात  समावेश करावा  अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघ् ट नाणी मा .  राज्यपाल व मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे कोरोनचे संकट जात पात ,पंथ धर्म पाहून येत नाही तर देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री समाजात  अंतर नको असे  म्हणतात मग ४७ पैकी ३ जातीना खावटी देणे आवश्यकच आहे विरोध मुळीच नाही मात्र उर्वरित आदिवासींचे काय असाही प्रश्न असून सरकार व आदिवासी विकास महामंडळाने याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे अन्यथा कोरोना नंतर भूकबळी व कुपोषण आदिवासी भागात वाढेल याची चिंता करणेही आवश्यक आहे . आज अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज रोजगार नसल्याने घरात बसून आहे तर रेशनचे धान्य मे मध्ये मिळणार असल्याने उडदवणे पांजरे ठाणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील आदिवासी  ठाकर कौदर कंद मुळे गोळा करून आपली उपजीविका भागवत आहे त्रिम्बकेश्वर जव्हार , भंडारदरा ते महाबळेश्वर पर्यंतचे सर्व आदिवासी नगदी भात नाचणी पिके घेतात चार महिने शेती करून उर्वरित वेळी इतर ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर करून आपले कुटुंब कसेबसे चालवतात शेतीमाल भात वरई हिरडा बेहडा नाचणी आदिवासी शेतकऱ्यांच्या घरात पडूणं आहे एकाधिकार खरेदी चालू नसल्याने व्यापारी येऊन मातीमोल किमतीत हा मा खरेदी केला जातो त्यातच मीठ मिरची घेतली जाते तर रेशन दुकानात सध्या तांदूळ दिला जात आहे काही आदिवासी पर्यटन व्यवसायावर आपले गुजराण करतात मात्र कोरोना मुळे तेही बंद आहे . हा समाज  मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखाली असून कोरोनामुळे त्त्यांच्यासमोर जगणे अवघड झाले आहे त्यामुळे राज्यातील आदिवासी जंगलाचा आधार घेऊन जगत आहे  टाळेबंदी अनेकांच्या जिवावर उठत असून त्याचा सर्वाधिक फटका गावशहरांपासून दूर राहणाऱ्या दुर्गम भागातील आदिवासींना बसू लागला आहे. तुटपुंजी मदतअपुरा शिधा आणि हाती नसलेला पैसा यांमुळे आदिवासींना जंगलातील कंदमुळेरानकेळी खाऊ न गुजराण करावी लागत आहे. नगर-ठाणे जिल्ह्यातील  अकोले मध्ये उडदवणे पांजरे घाटघर ,कुमशेत ,पाचनई कुमशेत मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटनाणे घाट आणि दाऱ्या घाटाच्या भागात सध्या हे चित्र मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे. करोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना निसर्गाने मात्र आदिवासींना साथ दिली आहे. मग आदिवासी महामंडळाने कोणत्या सुपीक डोक्यातून हा निर्णय घेऊन दुजाभाव केला आहे असा आदिवासी समाजाला प्रश्न सतावत आहे सरकारने व महामंडळाने सर्व समाजाला खावटी धान्यद्यावे अन्यथा कोरोनानंतर कुपोषण संकट या समाजावर येईल  याबाबत राज्यपालांनी देखील याबाबत आवश्यक ते आदेश द्यावेत .अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव , आदिवासी संघटना विजय भांगरे ,दगडू पांढरे  आदिवासी सेवक काशिनाथ साबळे भरत घाणे सुरेश गभाले पांडुरंग खाडे गणपत देशमुख ,श्रावण हिले दिपक देशमुख सचिन देशमुख अक्षय देशमुख ,सुरेश भांगरे सी बी भांगरे आदींनी केली आहे --डॉ संतोष ठुबे (प्रकल्प अधिकारी , राजूर )आदिवासी विकास महामंडल नाशिक यांच्या अधिनिस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एकाधिकार खरेदी योजनेतून खरेदी करण्यात आलेले सुमारे २८५०० क्विंटल अन्नधान्य आदिवासी कुटुंबाना वाटप करावयाचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने  आदिम जमाती कातकरी, कोलाम , माडिया कुटुंबाना प्राधान्याने देण्यात येणार आहे त्यचा सर्व्हे सुरु असून उर्वरित लोकांसाठी शासन स्तरावर निर्णय होईल कारण हे धान्य अल्प क्असून हे सर्वाना वाटणे शक्य नसल्याचे  ते म्हणाले  

*आदिवासी विकास महामंडळाने खावटी धान्य वाटपात सर्वांचा विचार करावा -आदिवासी विकास परिषद , संघटना



अकोले ता . २९:आदिवासी समाजाला रोजगार नाही उपासमारीची वेळ आली असल्याने  आदिवासी विकास महामंडळाने खावटी धान्य देण्यास सुरुवात केली तर अनुसूचित जमातीतील ४७ पैकी कातकरी कोलाम व माडिया कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना धान्य वाटप होणार आहे मात्र इतर आदिवासींना त्याचा लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे राज्यातील आदिवासी समाज संभ्रम अवस्थेत आहे . कोविड १९ उध्दभवल्याने राज्यातील आदिवासींना रोजगाराला मुकावे लागले असून जर पोटात घास गेला नाही तर पुन्हा जंगलात जाऊन कंदमुळे खाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे आदिवासी विभागाने हा निर्णय बदलून सर्वांचा त्यात  समावेश करावा  अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघ् ट नाणी मा .  राज्यपाल व मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे कोरोनचे संकट जात पात ,पंथ धर्म पाहून येत नाही तर देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री समाजात  अंतर नको असे  म्हणतात मग ४७ पैकी ३ जातीना खावटी देणे आवश्यकच आहे विरोध मुळीच नाही मात्र उर्वरित आदिवासींचे काय असाही प्रश्न असून सरकार व आदिवासी विकास महामंडळाने याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे अन्यथा कोरोना नंतर भूकबळी व कुपोषण आदिवासी भागात वाढेल याची चिंता करणेही आवश्यक आहे . आज अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज रोजगार नसल्याने घरात बसून आहे तर रेशनचे धान्य मे मध्ये मिळणार असल्याने उडदवणे पांजरे ठाणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील आदिवासी  ठाकर कौदर कंद मुळे गोळा करून आपली उपजीविका भागवत आहे त्रिम्बकेश्वर जव्हार भंडारदरा ते महाबळेश्वर पर्यंतचे सर्व आदिवासी नगदी भात नाचणी पिके घेतात चार महिने शेती करून उर्वरित वेळी इतर ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर करून आपले कुटुंब कसेबसे चालवतात शेतीमाल भात वरई हिरडा बेहडा नाचणी आदिवासी शेतकऱ्यांच्या घरात पडूणं आहे एकाधिकार खरेदी चालू नसल्याने व्यापारी येऊन मातीमोल किमतीत हा मा खरेदी केला जातो त्यातच मीठ मिरची घेतली जाते तर रेशन दुकानात सध्या तांदूळ दिला जात आहे काही आदिवासी पर्यटन व्यवसायावर आपले गुजराण करतात मात्र कोरोना मुळे तेही बंद आहे . हा समाज  मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखाली असून कोरोनामुळे त्त्यांच्यासमोर जगणे अवघड झाले आहे त्यामुळे राज्यातील आदिवासी जंगलाचा आधार घेऊन जगत आहे  टाळेबंदी अनेकांच्या जिवावर उठत असून त्याचा सर्वाधिक फटका गावशहरांपासून दूर राहणाऱ्या दुर्गम भागातील आदिवासींना बसू लागला आहे. तुटपुंजी मदतअपुरा शिधा आणि हाती नसलेला पैसा यांमुळे आदिवासींना जंगलातील कंदमुळेरानकेळी खाऊ न गुजराण करावी लागत आहे. नगर-ठाणे जिल्ह्यातील  अकोले मध्ये उडदवणे पांजरे घाटघर ,कुमशेत ,पाचनई कुमशेत मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटनाणे घाट आणि दाऱ्या घाटाच्या भागात सध्या हे चित्र मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे. करोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना निसर्गाने मात्र आदिवासींना साथ दिली आहे. मग आदिवासी महामंडळाने कोणत्या सुपीक डोक्यातून हा निर्णय घेऊन दुजाभाव केला आहे असा आदिवासी समाजाला प्रश्न सतावत आहे सरकारने व महामंडळाने सर्व समाजाला खावटी धान्यद्यावे अन्यथा कोरोनानंतर कुपोषण संकट या समाजावर येईल  याबाबत राज्यपालांनी देखील याबाबत आवश्यक ते आदेश द्यावेत .अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव , आदिवासी संघटना विजय भांगरे ,दगडू पांढरे  आदिवासी सेवक काशिनाथ साबळे भरत घाणे सुरेश गभाले पांडुरंग खाडे गणपत देशमुख ,श्रावण हिले दिपक देशमुख सचिन देशमुख अक्षय देशमुख ,सुरेश भांगरे सी बी भांगरे आदींनी केली आहे --डॉ संतोष ठुबे (प्रकल्प अधिकारी , राजूर )आदिवासी विकास महामंडल नाशिक यांच्या अधिनिस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एकाधिकार खरेदी योजनेतून खरेदी करण्यात आलेले सुमारे २८५०० क्विंटल अन्नधान्य आदिवासी कुटुंबाना वाटप करावयाचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने  आदिम जमाती कातकरी, कोलाम , माडिया कुटुंबाना प्राधान्याने देण्यात येणार आहे त्यचा सर्व्हे सुरु असून उर्वरित लोकांसाठी शासन स्तरावर निर्णय होईल कारण हे धान्य क्मिअसून हे सर्वाना वाटणे शक्य नसल्यचे ते म्हणाले  

Tuesday, April 21, 2020

‘दूधकोड’पासून ‘डोंगरजिरा’वर खवय्यांचा ताव बदलत चाललेल्या काळात समाजातील अनेक चांगल्या परंपरा, संस्कृतीचा ऱ्हास होत आहे.

महोत्सवात वैविध्यपूर्ण रानभाज्यांची ओळख; ५३ महिलांचा सहभाग
‘चवीने खाणार त्याला देव देणार’ या उक्तीचा अवलंब करत सुरगाण्याच्या शेवटच्या टोकावर गुजरात सीमेवरील रघतविहीर येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या सहयोगाने संकुल ग्रामोदय ही संकल्पना आणि रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात डोंगर-दऱ्यांतील ‘दूधकोड’पासून ‘डोंगरजिरा’पर्यंतच्या रानभाज्या परिसरातील महिलांनी तयार केल्या होत्या. खवय्यांनी त्यांचा आनंद लुटला.
बदलत चाललेल्या काळात समाजातील अनेक चांगल्या परंपरा, संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या अनेक वनौषधी वनस्पती, रानभाज्या आणि औषधी गुणधर्म यांची माहिती काळाच्या ओघात लुप्त होत असताना त्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वनवासी कल्याण आश्रमने रानभाजी महोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडली. या निमित्ताने गावकऱ्यांच्या सहकार्यातून रघतविहीर येथे महोत्सवाची आखणी झाली.
जलपूजा, वनपूजा झाल्यानंतर गावातील महिलांनी एकत्र येत रानभाज्या शिजवून ताटात सजवून कार्यक्रमस्थळी आणल्या. नाशिकच्या पाहुण्यांनी आणि इतरांनी सर्व भाज्यांची पाहणी केली. औषधी गुणधर्म विचारून माहिती करून घेतली. अनेक पदार्थाची चवही चाखली.
संकुल ग्रामोदयचे प्रकल्प समन्वयक अजित गावित यांनी प्रास्ताविक केले. या वेळी पंचायत समिती सदस्य विजय घांगाळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सहभागी महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे याकरिता वनवासी कल्याण आश्रम प्रदेश कार्यालयाच्या वतीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात आली. परिसरातील ज्येष्ठांनी रानभाज्यांचे नाव, उपयोग, औषधी गुणधर्म, त्यांची बदललेली नावे, संवर्धनाबाबत माहिती दिली. सहभागी सर्व महिलांना वनवासी कल्याण आश्रमातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.
रानभाज्यांची मेजवानी
प्रदर्शनात परिसरातील ५३ महिलांनी सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या रानभाज्यांमध्ये रुखआळू, वासती(बांबूचे), कुर्डू, खुरसनी, माठा, तरुठा, अंबाडी, करटोला, श्रीदोडा, बेल लोणचे, आंबा-करवंद लोणचे, गाठमुळे भाजी, खरशिंग भाजी, आळू-तेरा पातवड, कवदर, दूधकोड, दोडकी, फुलेरान, डोंगरजिरा, कडूकांद, अळिंबी, बाफळा चटणी, लिंबडा, डांगर, केणी, शेवगा, गोलखडा, नळभाजी अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता.

Monday, April 20, 2020

ममताबाई भांगरे

आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे.
कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे वेल. सभोवताली तसेच घराच्या भिंतीवर पोहोचलेले दोडक्याचे वेल. कारल्याचा मांडव. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत अशीच विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, गावठी वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत केलेली वाल आणि घेवडय़ाची लागवड ही शांताबाई धांडे यांची परसबाग. या बागेमध्ये जमिनीचा उतार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन फळझाडे, वेलवर्गीय भाज्या, कंदभाज्या, पालेभाज्या यांच्या लागवडी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथे काहीच नव्हते, खडक होता. जनावरे फिरायची. शांताबाई सांगत होत्या पण त्या छोटय़ाशा परसबागेतून हिंडताना त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. या सर्व भाज्या स्थानिक आहेत. पारंपरिक बियाणांचाच त्यासाठी वापर केलेला आहे आणि सर्व भाजीपाला, फळांचा मुख्यत: घरीच वापर केला जातो. फारच उत्पन्न आले तर थोडीफार भाजी बाजारात नेली जाते पण तीही क्वचितच. गावरान वाणांबरोबरच खत म्हणून गांडूळ खत यांचा वापर होतो. पूर्वी महिना पंधरा दिवसांतून भाजी घरी आणली जायची. आता मात्र मुबलक प्रमाणात भाजी, फळे उपलब्ध होतात. शिवरात्रीपर्यंत बाहेरून भाजीपाला आणावा लागणार नाही. शांताबाईचे पती खंडू धांडे सांगत होते. दोन वर्षांपूर्वी ‘बायफ’च्या (भारतीय कृषि अनुसंधान) मार्गदर्शनाखाली परसबाग लावायला सुरुवात केली. सर्वच कुटुंब आता त्या बागेच्या प्रेमातच पडले आहे. या परसबागेचा गवगवा झाल्यामुळे आता दूरवरून लोक ही परसबाग पाहायला येतात. त्यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. शांताबाईंचा मुलगा सोमनाथ एम.ए. बी.एड. झालेला आहे. त्याला विचारले असता, आईचा खूप अभिमान वाटतो असे तो म्हणाला.
आंबेवंगणच्या पुढेच देवगाव नावाचे खेडे आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची ही भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे घर आहे. कौलारू घर, पुढे बाजूला घरालगत पडवी. घरापुढे बोगन वेलीचा ऐसपस मांडव. ऑक्टोबरच्या कडक उन्हाची तिरीपही आत येऊ शकत नव्हती. प्रसन्न वातावरण. येथेही घराच्या सभोवताली असणाऱ्या इंचन् इंच जागेचा भाजीपाला, फळ लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर, भोपळा यांचे वेल. रताळ, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या पाहायला मिळाल्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला विविध फळांची झाडे. थोडय़ाफार पालेभाज्याही होत्या पण आम्हाला रानभाज्याच आवडतात असे ममताबाई सांगत होत्या. सासू-सासऱ्यांमुळे या रानभाज्यांचे ज्ञान झाले. सासूबाई असताना रानातून या भाज्या तोडून आणायचो, पण आता घराजवळच त्यांची लागवड केली आहे. चहा, साखर आणि तेल मीठ सोडले तर बाकी सर्व घरचेच वापरतो. धान्य, कडधान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत. गांडूळ खत, शेण खत यांचाच वापर केला जातो. सेंद्रीय व गांडूळ खतांच्या गोळ्या हा ममताबाईंचा स्वत:चा शोध. भातालाही त्या गांडूळ खतच वापरत पण ओढय़ालगतच्या शेतालगत टाकलेले खत वाहून जायचे. विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. गांडूळ खताचे लहान लहान गोळे केले, वाळवले. युरिया ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या शोधाची खूप प्रशंसा झाली. साधे नसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबाईंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे शांताबाई किंवा ममताबाई या दोघीही निरक्षर आहेत. पण ममताबाईंचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. या दोघींप्रमाणेच मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे, एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. ‘सीड क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरेंची परसबाग तर दृष्ट लागण्यासारखीच आहे. ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे पण कळसुबाई शिखराच्या आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी खेडय़ांमध्ये अशा अनेक ममताबाई, शांताबाई पाहावयास मिळतात.
आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी ही परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनी गावरान वाणांचे जतन परंपरेने केले आहे. पूर्वी त्या घराभोवती डांगर, भोपळा, काकडी अशा भाज्या लावायच्या. पण त्या कुठेही लावल्या जायच्या. कुपोषणाची समस्या दूर करायची असेल तर आदिवासींना दर्जेदार, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. घराभोवतीच्या दोन-तीन गुंठे जागेत योग्य नियोजन करून परसबाग फुलवली तर चार-सहा महिने ताजा भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ‘बायफ’ने परसबागेचा हा उपक्रम हाती घेतला. यात हंगामी परसबाग आणि बहुवर्षांयू परसबाग अशा दोन्ही प्रकारच्या परसबागांची लागवड केली जाते. सुरुवातीला स्थानिक भाजीपाल्यांचे विविध वाण एकत्र करून त्यांचे बियाणे संच (सीड कीट) तयार करण्यात आले. यामध्ये गावरान भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, गावठी काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यांसारख्या वीस-बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे पुरविण्यात आले. या बियाणांची वैशिष्टय़े म्हणजे हे स्थानिक वाण असल्याने एकदा पुरवठा केलेल्या बियांपासून तयार केलेल्या भाज्यांचा उपयोग पुढील हंगामासाठी होतो. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे आहेच तसेच खाण्यासाठी रुचकरही आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या शेणखत, गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा योग्य वापर करून या भाज्या पिकवल्या जातात. संस्थेच्या मार्गदर्शनामुळे या परसबागा अधिक सुबक व आहारदृष्टय़ा परिणामकारक ठरत आहेत. एका हंगामात सरासरी ४०० ते ६०० किलोपर्यंत ताजा भाजीपाला उत्पन्न होतो. वाहून जाणारे पाणी, सांडपाणी याचा काटेकोर वापर यासाठी केला जातो. बहुवर्षांयू भाजीपाला प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता अशी विविध फळझाडे घराच्या भोवती लावली जातात. मिळणाऱ्या फळांचा, फुलांचा आहारात वापर होतो. यातून रक्ताक्षय, कुपोषण कमी होण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील ३१ गावांमधील अडीच हजारपेक्षा जास्त कुटुंबांसाठी ‘बायफ’ ने हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती ‘बायफ’चे अधिकारी जितीन साठे यांनी दिली. पण आज त्यापेक्षाही अधिक कुटुंबांकडे ही चळवळ पोहोचली आहे.  इथल्या परसबागातून तयार झालेले बियाणांचे संच राज्याच्या अन्य भागांतही पोहोचले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या वर्षी असे आठ ते दहा हजार बियाणे संच वितरीत करण्यात आले. आज राज्याच्या विविध भागांतून या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ येथे येत आहेत. प्रत्येक घराभोवती अशी परसबाग उभी राहिली तर कुपोषणाला आळा बसू शकतो, त्यासाठी घर तेथे परसबाग ही चळवळ राबविण्याची गरज आहे.
प्रकाश टाकळकर – prakashtakalkar11@gmail.com

Sunday, April 19, 2020

कलिंगडाच्या खरेदीस व्यापाऱ्यांचा नकार, शेतकऱ्यांना आर्थिक चटके

कलिंगडाच्या खरेदीस व्यापाऱ्यांचा नकार, शेतकऱ्यांना आर्थिक चटके
दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : अंगाची लाहीलाही करणारे वाढते तापमान. उन्हात शरीराला थंडावा देणारे देशी फळ म्हणजे कलिंगड. थंडावा देणाऱ्या कलिंगडाला मागणीही आहे, उठावही आहे, मात्र त्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक चटके बसत आहेत. टाळेबंदीचे कारण सांगून कलिंगडाच्या खरेदीला व्यापारी नकार देत आहेत. शेतकऱ्यांना करोनाचे हे चटके उन्हापेक्षा तीव्रतेने बसत आहेत.
जिल्ह्य़ातील पुणे बाजारपेठ नजरेसमोर ठेवून वांगी, कडेगाव परिसरांतील शेतकरी कलिंगडाची लागवड करतात. दर वर्षी शहरी भागात चांगले ग्राहक मिळत असल्याने व्यापारीही जागेवर येऊन टनावर कलिंगड खरेदी करीत असतात. निचऱ्याची जमीन आणि हंगामी पाणी यावर वांगी, कडेगाव परिसरांत सुमारे दीड-दोनशे एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे.
कलिंगडचा हंगाम प्रामुख्याने शिमग्यानंतर सुरू होतो. यंदा करोनाचे संकट फेब्रुवारीपासूनच घोंघावत असताना मार्चअखेरीस याचे प्रत्यक्ष परिणाम जाणवू लागले. आज शहरात कलिंगड विक्री करणारी वाहने फिरत आहेत. मात्र दर नेहमीइतकाच असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हाती पैसे किती मिळतात? गरजू शेतकऱ्यांकडून दोन रुपये किलोनेही खरेदी होत नाही, मात्र बाजारात त्याचे दहा रुपये केले जात आहेत. मातीत घाम गाळून उत्पादन करणारा शेतकरी एकीकडे कंगाल, तर मध्यस्थ व्यापारी मालामाल अशी गत आहे.
करोना संकटाला तोंड देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या युद्धाची झळ शेती व्यवसायाला सर्वाधिक बसली आहे. शेतीमालाची साठवणूक करण्याची अथवा प्रक्रिया उद्योगच नसल्यामुळे माल तयार झाला तर तत्काळ बाजार दाखविल्याविना पर्यायच हाती नाही. याची झळ सध्या वांगी (ता. कडेगाव) परिसरातील कलिंगड उत्पादक शेतकरी सोसत आहेत. कडक उन्हाळ्यातील लोकांची प्रचंड मागणी तसेच दरवर्षी मुस्लीम बांधवांच्या उपवासाच्या रमजान महिन्यात कलिंगडाला असणारी नेहमीची मागणी आणि यामुळे मिळणारा चांगला दर या अनुषंगाने या वर्षीही कलिंगडाला चांगला दर मिळेल या अपेक्षेने कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६० ते  ७० हेक्टरवर कलिंगडची शेती करण्यात आली. यापैकी सुमारे १५ हेक्टर कलिंगड लागवड एकटय़ा वांगी गावातील शेतकऱ्यांनी केली होती.
मार्चअखेरपासून टाळेबंदी जाहीर झाल्याने सर्व भाजीपाला बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडा बाजार तसेच वाहतूक करणारी वाहने बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. गिऱ्हाईक नसल्याने व्यापारी फिरकत नाहीत, तर काही किरकोळ व्यापारी या बंदचा फायदा उठवत शेतकऱ्यांकडून कलिंगड केवळ २ ते ३ रुपये किलो दराने खरेदी करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करीत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांचा माल चांगला भाव मिळत नसल्याने आणि वाहतुकीची सोय नसल्याने शेतात पडून सडत आहे.
शेतकऱ्यांनी कलिंगडासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी त्यांनी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे; परंतु कलिंगडला दर नसल्याने त्यांच्या डोक्यावर लाखो रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्ज फेडण्याची चिंता त्यांना आहे.
या वर्षी सेंद्रिय कलिंगडची एक एकरची लागवड करण्यात आली आहे. पीक चांगले आले असून त्यांसाठी १.५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु सध्या करोना संकटामुळे माल तसाच शेतात पडून आहे. व्यापाऱ्यांकडून २ ते ३ रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.    – नितीन सूर्यवंशी, कलिंगड उत्पादक शेतकरी

कलिंगडाच्या खरेदीस व्यापाऱ्यांचा नकार, शेतकऱ्यांना आर्थिक चटके

करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असतानाच आता अवकाळी पाऊसही त्यात भर घालत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. काही भागांत वादळी पाऊस आणि गारपीटही झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतीमाल, फळबागांचे नुकसान झाले. काढणीची ज्वारी, गहू, हरभरा आणि कांद्यासह द्राक्ष, चिकू, कलिंगड, टरबूज आदींनाही पावसाचा फटका बसला आहे. कोकणामध्ये आंब्यालाही पावसाने तडाखा दिला. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्याच्या बहुतांश भागामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये आठवडय़ापासून मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश ते तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होतो आहे. परिणामी राज्यात पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. तीन ते चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली.
फळे, पिकांचे नुकसान
सोलापूर जिल्हामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने आणि गारपिटीने द्राक्षे, आंबा, चिकू, लिंबू गळून पडले, तर कलिंगड, टरबूज, पपई, काकडी जागेवरच सडून जाण्याची चिन्हे आहेत.ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचेही नुकसान झाले.
उत्तर महाराष्ट्रालाही तडाखा
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, उगाव परिसरात द्राक्ष, गहू, कांदा पिकांना फटका बसला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागातही पावसाची नोंद झाली.
भरपाईची मागणी
नगर जिल्ह्यतील कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या फळबागा, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली.
आंब्यांना फटका
विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने संगमेश्वर आणि लांजा तालुक्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे प्रामुख्याने आंब्यांना फटका बसला असून, अनेक ठिकाणी झाडावरचे आंबे गळून पडले. शनिवारी रात्री देवरूख परिसरालाही पावसाने झोडपून काढले. साखरपा परिसरातही वादळी पाऊस झाला. अनेक घरांचे पत्रे उडाले, तर परिसरात चार ठिकाणी झाडे कोसळल्याने दोन मार्ग बंद झाले आहेत.
पावसाची शक्यता कायम
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण आणि मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २० एप्रिलला संपूर्ण राज्यात आणि प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीच्या उकाडय़ात वाढ  राज्यामध्ये सध्या पावसाळी स्थिती निर्माण झाली असली, तरी दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील वाढ कायम आहे. दिवसाचे कमाल तापमान अनेक ठिकाणी सरासरीच्या पुढे आणि ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. रविवारी नाशिक येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Saturday, April 18, 2020

स्त्रियांना, एका ठरावीक वयानंतर घरी रिकामं वाटू लागतं. त्याच दरम्यान मुलं शिक्षणाच्या निमित्ताने अथवा परदेशी गेल्यामुळे घर सुनं-सुनं भासू लागतं. मुलांची उणीव भासत असते. याला एम्टी नेस्ट म्हणतात. रिकामं घरटं असे म्हणतात.
पती- पत्नी दोघे जण कायमच आपलं विश्व मुलांभोवती गंफू पाहत असतात. त्यामुळे मुलं बाहेर गेल्यावर, परदेशी-परगावी गेल्यावर घरात करमेना होतं. एक प्रकारची पोकळी जाणवते. पूर्वी तरी इंजिनीअरिंग कॉलेजसाठी मुलांना परगावी राहावं लागे. पूर्वीच्या मानाने आता इंजिनीअरिंगची संख्या वाढल्यामुळे मुलं आई-वडिलांजवळ राहून आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. तरीही शिक्षण अथवा नोकरीसाठी परगावी राहणा-या मुलांमुळे पती-पत्नींना एकप्रकारे रिकामपण जाणवतं. या रिकामपणावर उपाय काय करावा?
साधारणत: आपली ओळख ‘क्ष’ची आई असते आणि आपल्या पतीची ‘क्ष’चे बाबा अशी असते. आपण आपलीही ओळख बदलायला या वयात जड जातं. अशावेळी कुणाची तरी मित्र, कुणाची तरी मैत्रीण, कुणाशी तरी गप्पा मारणारी, शेजारी अशी नवीन ओळख आपण निर्माण करायला हवी. एखादा छंद लावून घ्यायला हवा.
सेवानिवृत्तीनंतर देखील अतिशय रिकामपण जाणवून हे लक्षण दिसू शकते.नव्या ओळखीत साडी, शर्ट, कपडे देवाण-घेवाण टाळा. काटकसर, भाडे बचत, सहली यांचा अतिरेक नको. मानसिकरीत्या कोणाच्या तरी जाण्यामुळे ही येणारी पोकळी अथवा मुलं शारीरिक रूपात दूर गेल्यामुळे निर्माण होणारी मनाला त्रास देणारी स्थिती यावर उपाय काय करावा.
याबद्दल मानसशास्त्र सांगते, तुमच्या जीवनातील अन्य ओळखीच्या अथवा अन्य कामांची भूमिका यांची यादी करा. आपल्या वेळेचे नियोजन करा आणि स्वत:ला अन्य कुठल्या तरी कामात गुंतवून घ्या.
जसे की, एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणे, एखादे वेगळे पुस्तक वाचणे, योगासन वर्ग लावणे. एखाद्या संस्थेत अथवा कट्टय़ावर जाणे. एखादी परीक्षा देणे. राहून गेलेल्या बेताखालील डिग्री घेणे. जसे की, कायदाचे शिक्षण अथवा कलेचे शिक्षण घेणे.
रिकामं घरटं ही अवस्था वाईट असते, केवळ ती सोसणारी व्यक्तीच जाणू शकते. बाकीच्यांना सांगितलं तर ते लोक म्हणतात, सुख बोचतंय त्यामुळे आपणच आपल्या मनस्थितीवर उपचार करणं आवश्यक असतं. मुलांचं करता करता, आपण घरात आई आणि दाईच बनलेले असतो. त्यामुळे काय एखाद्या वेगळ्या कुठल्यातरी क्षेत्रात स्वत:ला गुंतवावे. एखाद्या सहलीला, यात्रेला जावे, आपले मूल आता मोठे झालेय, आपल्यात नाही अन्य कुठे तरी आहे. मुलापासून दूर राहणे, हा पण तो त्याच्या भल्यासाठीच घेतलेला आपला निर्णय आहे. अथवा विद्यार्थ्यांचाच तो निर्णय आहे, हे जाणून नवीन कामात स्वत:ला गुंतवून घ्या.
पटकन या रिकाम्या घरटय़ाच्या भावनेतून बाहेर पडणं सोप नाही. पण, प्रयत्न करा, मैत्रीतून विचार प्रकट करा. मन मोकळं करा. गप्पा मारा.
सामान्य माणसं कुणालाही मदत करताना फायद्याचा विचार करतात, पण अशी साधी नसलेली अथवा विक्षिप्त माणसं उपयोगी पडतात. नेहमीच नाहीत, मात्र झंझावातासारखी माणसं देखील कधी-कधी माणुसकीला जागतात आणि रिकाम्या घरटय़ात वावरणा-या वृद्धांना मदत करतात.
संकटकाळी मदत मिळणं, अडीअडचणीला एखादा माणूस उभा राहणं, एवढीच या वयात अपेक्षा असते. मात्र, वृद्धांच्या भानगडीत पडायला नको, त्यांची मुलं परक्या गावी असतात.
आपल्यावर जबाबदारीची नको, वगैरे वगैरे कारणाने, सहनिवासी मदत करायला नकार देतात. वृद्ध लोक तर अधिकच एकाकी होतात. मदतीला देखील माणसे धावून जात नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांच्या एखाद्या संस्थेशी स्वत:ला निगडित करून ठेवावे. अहंकाराचा अति पसारा वाढवू नये, नम्र राहावे. साध्या माणसात वावरावे. आयुष्य असे असते की, जो दिखता है वो नहीं होता है, जो नहीं दिखता है वो होता है, त्यामुळे माणसं, प्रश्न औपचारिक ठेवा. स्वत:ला ग्रेट समजू नये. राजकीय कारणाने तू अमूक पक्षाचा, मी तमूक पक्षाची, तो असा ग्रेट, मी हा असा, अशी भांडणे वाढवण्याची काहीच गरज नाही. नातेसंबंध जपावे. रिकामं घर हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो, मात्र छंद आणि परिचयातील लोक यांच्या मदतीने रिकाम्या घरटय़ात भावभावनांच्या पोकळीतील वाईट काळाशी तडजोड करता येते.
आकाशी झेप घेतलेल्या पाखरांना उडू देत, तुम्ही रिकाम्या घरटय़ातही स्वत:चं अस्तित्व निर्माण करा. खूश राहा.

Friday, April 17, 2020

*मनुष्यप्राणी घरात बंद आणि पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असे दुर्मीळ चित्र शहर व परिसरात *




अकोले , ता . १७:आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे .... असे गाणे गुणगुणत पशु पक्षी आकाशात  विहार करताना दिसत आहे,भंडारदरा,घाटघर,रतनवाडी,कळसूबाई,हरिसचंद्रगड अभ्यरण्यात यावर्षी मुबलक पाणी व चारा असल्याने व कोरोना व लॉकडाऊन मूळे मानव प्राणी घरातच बंद तर पशु पक्षी आनंदी गाणे गुणगुणत या झाडांवर तर त्या डोंगर कपारीत बसून आपले दिवस कुही कुही .. मंजुळ स्वराने एकमेकांना साद घालत आपल्या आविष्काराने निसर्गाच्या आविष्काराला न्हाहळत त्याच्या सानिध्यात घालवत आहे .वनविभागाने संपूर्ण बंदी घातल्याने पर्यटक या भागात फिरकत नाही .प्रदूषणाचा लवलेश नसलेली मोकळी स्वच्छ हवा, मर्यादित मानवी हस्तक्षेप आणि शांत, सुंदर, मोकळा अधिवास असे आल्हाददायक वातावरण अनुभवणारे पशुपक्षी निसर्गप्रेमींना सुखद धक्का देत आहेत. करोना विषाणू प्रतिबंध म्हणून पाळण्यात आलेल्या बंदमुळे समस्त मनुष्यप्राणी घरात बंद आणि पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असे दुर्मीळ चित्र शहर व परिसरात सध्या पाहायला मिळत आहे.शेतशिवारात गेलेले पक्षी हे टाळेबंदीच्या अवघ्या २१ दिवसांत पुन्हा मानवी वस्तीजवळ परतून आले आहेत.  त्यामुळे आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने पुन्हा दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे देशात कडकडीत बंदची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास परवानगी नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान, बेरोजगारी यांसारखी संकटे आहेतच, मात्र करोना विषाणू संसर्गाचा सकारात्मक पैलू म्हणून वन्यजीवांचा मुक्त संचार ही एकमेव बाब समोर आली आहे.  वनविभाग आणि निसर्ग सवांद यांचे   कॅमेऱ्यात पशू-पक्ष्यांचा हा मोकळा वावर कैद करण्यात आला आहे. त्यांमध्ये धनेश, भारद्वाज, स्वर्गीय नर्तक, सातभाई, शिंपी,तिबोटी खंड्या, किंगफिशर 
 
 घुबड असे पक्षी तर माकड ,लांडगा, कोल्हा, वानर ,मोर ,ससा  , मुंगूस असे प्राणी आढळून आले आहेत.

 सक्तीचे घरी राहणे माणसांसाठी कितीही कंटाळवाणे असले तरी पश-पक्षी मात्र या परिस्थितीचा आनंद लुटताना दिसत आहेत. गावात व  परिसरात कावळे, कबुतरे असे मोजके पक्षी दिसतात. चिमण्यांचे दर्शन देखील दुर्मीळ असते. माणसांचा वावर कमी झाल्यानंतर सोसायटीच्या गच्चीवर घुबड आश्रयाला येत आहेत. मोकळ्या बागांमध्ये भारद्वाज पक्षी बागडताना दिसत आहेत. धनेश पक्षी घराच्या खिडक्यांपर्यंत येत आहेत. हा बदल आल्हाददायक आहे. माणसांना, मुलांना निसर्गाच्या जवळ नेणारा आहे.कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा वन परिक्षेत्रामध्ये भंडारदरा धरण व घाटघर उदंचन प्रकल्पासारखे मोठे पाणवठे असून या वर्षी मुबलक प्रमाणात पावसाने या अभयारण्यावर प्रसन्नता दाखविल्याने वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही.  वन्य प्राण्यांच्या प्रगणनेमध्ये या अभयारण्यात प्राणी व पक्षांची संख्या वाढल्याचे दिसून आले

शहरांबरोबरच ग्रामीण भागात वन्यजीवांच्या हालचाली कशा आहेत हे पाहण्यासाठीनिसर्ग सवांद फाउंडेशन आणि वनविभागाने लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यांची मदत झाली आहे. पाणवठय़ांवर येणाऱ्या प्राण्यांची वर्दळ वाढली आहे. बिबटय़ा, रान मांजरे, कोल्हे, लांडगे, मुंगूस यांच्या हालचाली मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. .  सोबत फोटो akl १७प ४,५,६,७,८,९,अत्यंत सुरेख प्रतिमा मिळालेला क्षण म्हणजे हा तिबोटी खंड्या ... भारतात खंड्याच्या १२ जाती आहेत ... त्यातला हा खंड्या सगळ्यात सुंदर आहे छाया किशोर जोशी 








आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...