Friday, May 22, 2020

* आदिवासींचा जंगली माल घरातच पडून खर्डी विक्री केंद्र बंद , सरकारही लक्ष्य देईना






अकोले,ता. २२ : जंगलात राहणाऱ्या आदिवासी साठी प्रधानमंत्री वनधन  विकास केंद्र  योजना राज्य सरकारने मान्य  करून६ मे २०२० रोजी त्याचा अध्यादेश काढण्यात आला मात्र ट्रायफेड कडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव प्रलंबित असल्याने आदिवासी   जंगली माल तसाच पडून असून त्यामुळे आदिवासी समाजाची मोठी ससेहोलपट पाहायला मिळत आहे . जिल्हाधिकारी यांनी खरेदीस परवानगी दिली असली तरी जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तो पर्यंत जंगली माल  खरेदी करणे अशक्य असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले आहे . जंगलात निर्माण  होणाऱ्या गौण वनोउपजावर आदिवासींचे परंपरागत ज्ञानाचा ,कौशल्याचा तसेच त्यासोबत आधुनिक माहिती  तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गौण वनोउपजावर प्रक्रिया करणे व त्याचे मुल्यसंवर्धन करुन त्याची विक्री करणे, त्यामुळे आदीवासीचे जीवनमानउंचावणे  हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कें द्र शासनाच्या जनजाती कार्य  मंत्रालयाचे अधि सूचना क्रमांक-१९/७/२०१९आजीविका दि . .२६. ०२.२०१९ अन्व्ये प्रधानमंत्री वनधन विकास  कें द्र ही योजना कें द्र शासनानेकार्यान्वित  केली अहे. त्याऄनुषंगाने, राज्यातील स्वयंसहायता गट ज्यामध्ये अनुसूचित जमातीचे किमान ७० टक्के सभासद आहेत त्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या गौण वनोपजाचे  व इतर बाबीवर मूल्यवर्धन करून त्याची विक्री करण्यासंदर्भातील  प्रधानमंत्री वनधन विकास  ही योजना राज्यामध्ये राबववण्यास मान्यता  देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीची एकाधिकार खरेदी केंद्र योजना  बंद करण्यात  अली आहे या योजनेसाठी खरेदी परवानगी साठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी ,खासदार , आमदार ,उपप्रादेशिक व्यवस्थापक या कमिटीचे सदस्य असून खरेदीसाठी प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन तो प्रस्ताव शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व्यवस्थपकीय संचालक नाशिक यांचेकडे पाठवून त्यांनी राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे पाठवून राज्य शासनामार्फत  भारतीय जनजाती सहकारी विपणन विकास संघ मर्यादित (ट्रायफेड )नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठविलेअसून त्यात नगर जिल्ह्याचा प्रस्ताव असून ९ वेळा पाठपुरावा करूनही अद्याप मंजुरी नसल्याने नगर जिल्ह्यात खरेदी करणे अशक्य झाल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर पाटील म्हणाले . तर इतर जिल्ह्यात सोसायटी मार्फत खरेदी होते जिल्ह्यात मात्र बचत गटाच्या माध्यमातून खरेदी करावयाची असल्याने फारश्या संस्था पुढे येताना दिसत नाही . राज्य सरकार व भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ म्हणजेच ट्राय फेड नवी दिल्ली यांच्यात समन्वय नसल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असून आदिवासींचा जंगली माल  तसाच पडून आहे . याबाबत खासदार सदशिव लोखण्डे यांनी ट्रायफेड नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधून कोरोनाच्या  पार्शवभूमीवर मंजुरी देऊन आदिवासींचे हाल थांबवावेत असे म्हटले आहे तर माजी आमदार वैभव पिचड यांनीही नाशिक येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व्यवस्थपकीय संचालक  यांचेकडे खरेदी बाबत विचारणा करून केंद्रीय आदिवासी विकास मंत्री यांनाही संपर्क केला आहे . केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय साधून आदिवासींचा जंगली माळ खरेदी करावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात "हिरडा" हे एक उपजिविकेचं महत्वाचं साधन आहे.अनेक शेतकर्यांच्या शेतात हिरडा या वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमानात आहेत.हा भाग "अभयारण्यात" मोठ्या प्रमानात आहे.येथील मजूर वर्ग जंगलातून व स्वताच्या शेतातिल झाडांवरिल हिरडा हा मोठ्याप्रमानात साठवन करत असतो."हिरडा" हि एक आैषधी वनस्पती आहे.व त्या पासून नैसर्गिक रंग हि बनवले जातात.अकोले तालुक्यात "हिरडा प्रक्रिया केंद्र" होणे हि काळाची गरज आहे.आज हि हिरडा हा २०० ते २५० रु किलो च्या भावाने इथला व्यापारी वर्ग विकत घेतो आहे.जर तालुक्यात हिरडा प्रक्रिया केंद्र उभारले गेले तर येथील शेतकर्याला व मजूर वर्गासाठी हे एक मोठे रोजगाराचे साधन ठरु शकेल.लोकप्रतिनिधीं या हिरडा प्रक्रिया केंद्रासाठी पुढाकार घेतिल हि खात्री आहे.वनधन विकास केंद्र स्थापन करणे :-
१. जवळपासच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीत जास्त २० लाभार्थी मिळून १ स्वयंसहाय्यता गट (SHG) मिळून १ वनधन विकास केंद्र स्थापन करण्यात येईल.स्वयंसहाय्यता गट हा गावपातळीवरील अथवा आजूबाजूच्या गावातील असावे.२. स्वयंसहाय्यता गटामध्ये जास्तीत जास्त २० लाभार्थी मिळून १ स्वयंसहायता गट ।(SHG) तयार करावे ज्यात कमीतकमी ७०% पेक्षा जास्त लाभार्थी आदिवासी राहतील.३. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पेसा किंवा वनहक्क कायदा अंतर्गतग्रामसभेच्या मान्यतने स्थापन केलेली समिती किंवा स्वतः ग्रामसभा, आदिवासीसहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) व स्वयंसेवी।संस्था (NGO) यांचे अस्तित्वात असलेले स्वयंसहायता गट हे वनधन स्वयंसहाय्यतागटाचे कार्य करु शकतात.स्वयंसहाय्यता गटातील (SHG) सदस्याचे किमान वय १८ वर्ष असणे आवश्यक आहे.वनधन विकास केद्राच्या व्यवस्थापन समितीमध्ये प्रत्येक स्वयंसहायता गटाचा१ प्रतिनिधी असणे अपेक्षित राहील व त्यामधून वन धन केंद्राचा अध्यक्ष व सचिव निवडलाजाईल. अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जमातीचे असणे आवश्यक राहील.६. प्रत्येक स्वयंसहायता गटाने त्यांच्या नजीकच्या बँकेत बँक खाते उघडणे अपेक्षित आहे.हे बँक खाते स्वयंसहाय्यता गटाच्या नावे असावे, परंतु बचत गटाने यापूर्वी बँक खातेउघडलेले असल्यास ते देखील ग्राहय धरता येईल व स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष वसचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने व्यवहार करणे अपेक्षित आहे.७. वनधन विकास केंद्राच्या निर्देशानुसार स्वयंसहाय्यता गट कार्य करेल.८. अस्तित्वात असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), पेसा किंवा वनहक्क कायदा अंतर्गतग्रामसभेच्या मान्यतेने स्थापन केलेली समिती किंवा स्वतः ग्रामसभा, आदिवासीसहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO)/प्राधिकरणं (Agency) यांच्या स्वयंसहायता
गटाना सुद्धा वनधन केंद्र स्थापन करण्यात हरकत नाही. त्यासाठी त्यांचे पूर्वी तयारझालेले स्वयंसहायता गट फोडण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रत्येक वनधन केद्रातकमीत कमी ३०० लाभार्थी असणे आवश्यक आहे.९ . वनधन विकास केंद्र व स्वयंसहायता गटाची व्यवस्थापन समिती यांच्या सदस्याने.बँकेत खाते उघडणे अपेक्षित आहे व या समितीने ठरवून दिलेल्या २ सदस्य या बकखात्याचे व्यवहार संयुक्त स्वाक्षरीने करणे अपेक्षित आहे.१०)वनधन केंद्र वर्षभर कार्यन्वित ठेवण्याकरिता गौण वनोउपजामध्ये  समाविष्ट नसलेल्या सिताफळ, जंगली आलं, फणस, समिधा, पळसपान व कृषीउपज इत्यादींचेमुल्यवर्धन करणे या बाबी ग्राहय धरण्यात येतील.११.वनधन विकास केंद्राला स्थानिक स्तरावर सहकार्य करण्यासाठी राज्य अभिकर्तासंस्था (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक) मधील शाखाव्यवस्थापक आणिमहाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिकव्यवस्थापक हे संबंधित क्षेत्रात योजना राबविण्यास सहकार्य करतील.१२.वनधन विकास केंद्र हे गौण वनोपजाचे संगोपनाची प्रक्रिया करण्यासाठी कार्य करतअसताना त्या गौण वनोउपजाचे मूळ र्त्रोताला बाधा होणार नाही याची खबरदारीघेईल व शाश्वत पध्दतीने त्याचा उपयोग केला जाईल याची खबरदारी घेण्यात येईल.१३.वनधन विकास केंद्र वरीलप्रमाणे कार्यवाही करत नाही असे आढळल्यास राज्यअभिकर्ता (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक)/प्रकल्प
अधिकारी याबाबत पुढील आर्थिक अनुदान देणेबाबत निर्णय घेतील.वनधन विकास केंद्राचे प्रस्ताव प्राप्त करुन त्याची तपासणी व शिफारस करण्यासाठीखालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे.प्रकल्प समिती प्रकल्पअधिकारी,प्रादेशिकव्यवस्थापक,संबंधितसंस्था/MAVIM/MSRLM/स्वयंसेवी
৭.
अध्यक्ष
२.
सदस्य
३.
निमंत्रित सदस्य
संस्था/ग्रामसभा अध्यक्ष
४.
शाखा व्यवस्थापक
सदस्य सचिव
बनधन विकास केंद्रास मंजूरी देण्याबाबतची कार्यपध्दती :-
१. वनधन विकास केंद्र उभारणीकरीता अर्जा सोबत जोडलेले परिशिष्ट-१, २, ३, ४ व ५,
(व्यवसाय आराखडा) संबंधित प्रकल्प समितीकडे व अभिकर्ता संस्था (शबरी आदिवासी
वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक) यांचेकडे सादर करावेत. त्याशिवाय
अभिकर्ता संस्था त्यांचे स्तरावर प्राप्त झालेले प्रस्ताव पण छाननी करु शकतात.
२. प्रकल्प समितीकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करुन सदर प्रस्ताव पुढील
कार्यवाहीस्तव अभिकर्ता संस्था (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित,
नाशिक) यांचेकडे अग्रेषित करावेत.
३. अभिकर्ता संस्था (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक) यांनी सर्व
मंजूर केलेल्या वनधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत भारतीय जनजातीय सहकारी
विपणन विकास संघ मर्यादित (ट्रायफेड), नवी दिल्ली येथे मंजूरीसाठी पाठविले जातील.
पृष्ठ १३ पैकी ४

भारतीय जनजातीयसहकारी विपणन विकास संघ  मर्यादित (ट्राय फेड )नवी दिल्ली यांचेकडील कार्यकारणी समिती त्यास मान्यता देऊन राज्य शासनास कळवेल
४. मंजूर वनधन केंद्रास अभिकर्ता संस्था (शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
पादित, नाशिक) एक स्वतंत्र ID NUMRER व नाव प्रदान करेल व वनधन विकास कद्रान
यापत्रव्यवहारात या नावाचा व ID NUMBER चा उल्लेख करणे अपेक्षित राहील.
वन धन केंद्रासाठी लागणारा निधी :-
कद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक वनधन विकास केंद्र प्रशिक्षणासाठी रुपये
५.०० लक्ष (रुपये पाच लक्ष फक्त) व वनधन केंद्रासाठी उपकरणे खरेदीकरीता रुपये
१०.०० लक्ष (रुपये दहा लक्ष फक्त) असे एकूण रुपये १५.०० लक्ष (रुपये पंधरा लक्ष फक्त)
निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होईल. तसेच वनधन विकास केंद्र बळकटीकरणासाठी
रुपये २०.०० लक्ष (रुपये वीस लक्ष फक्त) इतका निधी प्राप्त होईल. तो खालील बँक
खात्यात निधी जमा होईल.
अभिकर्ता संस्थेचे नाव :- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक
बैंकेचे नाव
:- बँक ऑफ महाराष्ट्र
शाखेचे नाव
:- कॅनरा कॉर्नर- ६७२
खाते क्रमांक
:- ६०३४४९०९१९८
बँकेचा IFSC क्रमांक
:- MAHB০০००६७२
२. वनधन विकास केंद्रास फिरता निधी (Revolving Fund) न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत
रुपये ७.५० लक्षच्या (रुपये सात लक्ष पन्नास हजार फक्त) मर्यादेत उपलब्ध करण्यांत
येईल. वनधन केंद्रास मान्यता दिल्यानंतर जर निधी शबरी महामंडळामार्फत वनधन
केंद्रास द्यावयास असल्यास संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ राज्य अभिकर्ता
संस्था (शबरी आदिवासी व वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक) यांचेकडे वर्ग
करावा अथवा प्रकल्प अधिकारी स्वत: सदर निधी वनधन विकास केंद्रास वर्ग करु
शकतील. ही रक्कम ना-परतावा राहील. असे करताना प्रकल्प अधिकारी यांनी
अभिकर्ता संस्थेला कळविण्यात यावे. अभिकर्ता संस्था या योजनेच्या अनुषंगाने अद्ययावत्
माहितीचे संकलन ठेवेल व या करीता पोर्टल तयार करेल.
३. वनधन केंद्राचा प्राप्त निधी वापराबाबत लवचिकता देण्यात आली आहे. उदा. एखाद्या वन्
धन स्वयंसहायता गटाला प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्यास सदरचा निर्ी वनधन
विकास केंद्राच्या इतर बाबींकरीता राज्य अभिकर्ता संस्था (SIA) (शबरी आदिवासी व विच
व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक) यांच्या मान्यतेने वापरू शकतील.शासन निर्णय क्रमांकः एमएफपी-२०२०/प्र.क्र.३० / का.३
০. ज्या स्वयंसहायता गटांकडे मूल्यवर्धन करण्याकरीता उपकरणे उपलब्ध आहेत त्यांनी
सदरचा निरधी दुसर्या बाबींवर राज्य अभिकर्ता संस्था (SIA) (शबरी आदिवासी व वित्त व
विकास महामंडळ मर्यादित. नाशिक) यांच्या मान्यतेने वापरावा.
प. वनधन विकास केंद्राकरीता लागणारी उपकरणे (मशिन्स) इत्यादी राज्य अभिकर्ता संस्था
(SIA)/प्रकल्प समिती यांनी GEM PORTAL अथवा ई-निविदा प्रक्रिया राबवून वनधन
विकास केंद्राला उपलब्ध करून देतील.
६. वनधन विकास केंद्राला वाहतुकीसाठी वाहन खरेदी करणे तसेच साठवणुकीसाठी गोदाम
बांधणे इत्यादी बाबींकरीता निधीची तरतृद करण्यात आलेली नाही. परंतु वनधन विकास
कैंद्र वाहतूक व साठवणूकीसाठी जागा भाडेतत्वावर घेऊ शकतात.
वन धन विकास केंद्राची तपासणी :-
वनधन विकास केंद्र सुरळीत चालू आहे किवा कसे यासाठी प्रकल्प समिती मार्फत
तपासणी करण्यात यावी. तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने नेमून
देण्यात आलेले अधिकारीसुद्धा वन धन केंद्राची तपासणी करतील. तपासणीत काही
अनियमितता आढळल्यास वनधन विकास केंद्राचे बँक खाते गोठवून अथवा वनधन विकास
केंद्राकडे असलेली मालमत्ता ताब्यात घेऊन अनियमित रक्कमेची वसुली करण्यात येईल.
= त्याचप्रमाणे भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ मर्यादित (ट्रायफेड), नवी
दिल्ली यांचेकडून वेळोवेळी त्रयस्थ संस्थेमार्फत वनधन विकास केंद्राची तपासणी व त्याचे
मुल्यमापन करण्यात येईल. भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ मर्यादित
ट्रायफेड), नवी दिल्ली च्या अधिकाऱ्यांना व त्यांनी नेमलेल्या त्रयस्थ संस्थेस
तपासणीसाठी वनधन विकास केंद्र योग्य ते सहकार्य करेल.
उपयोगिता प्रमाणपत्र :-
परिशिष्ट-६ प्रमाणे उपयोगिता प्रमाणपत्र वन धन केंद्राने प्रकल्प समिती तसेच शब
आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचेकडे सादर करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळा
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००५०६१७५०१४८५२४ असा आहे. हा आदे
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Laxmikant
Gopalrao
Dhoke
(ल.गो. ढोके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव यांनी हा आदेश पारित केला आहे .  सोबत फोटो AKL २१P १,२,३,४  

Thursday, May 21, 2020

ग्रामीण भागातील चुलीचा धूर कमी करण्यासाठी गॅस

ग्रामीण भागातील चुलीचा धूर कमी करण्यासाठी गॅस सबसीडी सारखे विविध उपक्रम केंद्र सरकारकडून सुरु आहेत. मात्र, सध्याच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी तसेच, पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणाऱ्या इंधनची पुर्वतयारी म्हणून मावळातील ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. गॅस इंधनाला पर्याय म्हणून शेणाच्या गोवऱ्या तयार केल्या जातात. उन्हाळा सुरु होताच मावळ आणि परिसरात गोवऱ्या थापण्याची लगबग सुरु आहे.
गोवऱ्यांची साठवणूक व्यवस्थित करण्यासाठी पवनमावळ भागात कलवड लावण्यास सुरुवात झाली आहे. तर, काहींचे कलवड लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी गॅसचा वापर कमी करावा लागतो. तसेच, त्यासाठी हा चांगला उपाय असल्याने वर्षानुवर्षे शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्याची खास काळजी घेण्यात येते. तीव्र उन्हामध्ये ती वाळवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील लागणाऱ्या इंधनाच्या तयारीसाठी शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या चोरीला जावु नये आणि पावसाळ्यात भिजु नयेत यासाठी गोवऱ्या कलवड स्वरुपात ठेवल्या जातात.
चौकट- आदिवासी समाजाचा पावसाळ्यातील मुख्य आधार कलवड असून तिच्या साठी आदिवासी महिला खूप मेहनत घेत असतात. पावसाचा कितीही जोर असला तरी या कलवडीमुळे गोवऱ्याचे रक्षण होते.विशेष टेक्निक वापरून गोवऱ्यासाठी आच्छादन केलेली कलवड ही ग्रामीण व आदिवासी भागातील  महिलांच्या परिश्रमाचे यशच मानले पाहिजे.            जितीन साठे,विभागीय अधिकारी,बायफ, नाशिक



केंद्र सरकारने उज्वला गॅस  योजना आणून प्रत्येक वाडी वस्तीवर गॅस पोहचवला असला तरी दादा आमचा गॅस तयार झाला,तुमच्या कडे आहे का असा गॅस....हे वाक्य आपल्या कानावर पडते ते अकोले तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात. अकोले तालुक्यातील  अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या आदिवासी व ग्रामीण भागामध्ये सध्या पावसाळ्यापूर्वीची तयारी चालू झाली असून चार 

Tuesday, May 19, 2020

पूरक उद्योगासाठी बहूपयोगी वृक्ष - मोह

पूरक उद्योगासाठी बहूपयोगी वृक्ष - मोह

मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो. या वृक्षाचे फायदे पाहता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. 

मोहाच्या झाडाला आदिवासी लोक कल्पवृक्ष मानतात. या वृक्षाचे मूळ स्थान भारत आहे. मोहाला वसंतऋतूत फुले लागतात. पानझडी वनस्पतींमध्ये वृक्षवर्गात याचा समावेश होतो. हा वृक्ष पर्णझडी मिश्र जंगलामध्ये नद्या- नाल्यांचे काठ, शेताचे बांध इ. ठिकाणी आढळतो. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओरिसा, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या डांग भागात कमी-अधिक प्रमाणात हे वृक्ष आढळतात. या वृक्षाची लागवड मुद्दामहून काही ठिकाणी करण्यात आली आहे. राज्यात ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, विदर्भ इत्यादी ठिकाणी मोहाची झाडे आढळून येतात. ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व मुरबाड तालुक्‍यांतील लोक उन्हाळ्यात येथील मोहाची फुले, बिया गोळा करून त्याची स्थानिक पातळीवर विक्री करतात किंवा तेल काढतात. 

आर्थिक महत्त्व - 
1) वनसंवर्धनासाठी उपयुक्त वृक्ष. 
2) बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल, 16 टक्के प्रथिने. 
3) मोहाच्या तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो. 
4) पेंडीचा उपयोग शेतीला सेंद्रिय खत व कीडनाशक म्हणून होतो. 
5) झाडाची साल औषधी आहे. लाकडाचा उपयोग इमारती व इतर कामांसाठी होतो. 

शास्त्रीय माहिती - 
1) कूळ - सॅपोटॅसी 
2) शास्त्रीय नाव - मधुका इंडिका आणि मधुका लॉन्जिफोलिया. 
3) मोहाचे झाड हे द्विदल प्रकारातील आहे. झाड अतिशय जलद गतीने वाढते. झाडाची उंची साधारण 15 ते 20 मीटर असते. घेरही मोठा असतो. 
4) झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. खोड मजबूत व टणक असते. पाने लंबगोलाकार, फांदीच्या शेंड्याला गुच्छाने फुले येतात. 
5) झाडाला 8 ते 12 वर्षांनंतर फळे यायला सुरवात होते. फुले येण्याचा कालावधी फेब्रुवारी ते एप्रिल महिना आणि फळे येण्याचा कालावधी एप्रिल ते जून महिना असा आहे. 

झाडाचे विविध उपयोग - 
मुळे - 
मुळांचा उपयोग अल्सरच्या आजारावर करतात. 

लाकूड - 
1. लाकूड चांगले टणक ,मजबूत आहे. वाळवी लागत नाही, पाण्यातही कुजत नाही. लाकडाचा उपयोग घरकाम, फर्निचर, लाकडी खेळणी, तसेच कृषी अवजारे बनविण्यासाठी करतात. 
2. लाकडाचा उष्मांक चांगला असल्याने जळण म्हणून उपयोगी. 
3. लिखाणाचे कागद, प्रिंटिंग पेपर बनविण्यासाठी लाकडाचा लगदा वापरतात. 

साल - 
1. खोडाच्या सालीचा काढा हिरड्यांमधील रक्तस्राव, तोंडाचा अल्सर आजारात उपयुक्त.
2. आतड्याच्या जखमांवर, तसेच आंतरिक रक्तस्राव थांबविण्यासाठी उपयोग. 
3. रंगनिर्मितीमध्ये खोडाच्या सालीचा उपयोग. 

पाने - 
1. आयुर्वेदिक औषधांमध्ये त्वचारोगावर पानांचा वापर होतो. 
2. जनावरांना खाद्य, तसेच खत म्हणून उपयोगी. 
3. पत्रावळी बनविण्यासाठी उपयुक्त. 

फुले - 
1. भाजी व खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपयोग. फुलांच्या पाकळ्यांत नैसर्गिक शर्करा व जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची उकडून भाजी केली जाते. 
2. भरपूर ग्लुकोज असणारी ही फुले वाळवून भाजून किंवा नुसती वाळवूनही खातात. ही वाळविलेली फुले किशमिशसारखीच पौष्टिक आणि रुचकर असतात. 
3. फुलांपासून व्हिनेगार, अल्कोहोल व त्यापासून इंधननिर्मिती. 
4. मोहांच्या फुलांचा मध इतर मधापेक्षा गोड असतो. 
5. फुलांच्या रसाचा वापर कफ व अस्थमा या श्‍वास रोगांत, चेतासंस्थेच्या आजारात होतो. 
7. संग्रहणी आणि आम्लपित्तांच्या रोग्यांनाही मोहाचे फूल उपयोगी आहे. 

फळे - 
1. पक्षी व वटवाघळांचे आवडीचे खाद्य. 
2. फळांचा उपयोग शिकेकाईबरोबर केस धुण्यासाठी. 
3. फळे शुक्रवर्धक, बल्य आणि शीतल आहे. 
4. फळांचा भाजीसाठी उपयोग करतात. 

बिया - 
1. तेलनिर्मितीसाठी बियांचा उपयोग. 
2. बियांपासून तयार केलेले मलम त्वचा उजळ होण्यासाठी वापरतात. 
3. बियांपासून सुगंधी तेल मिळते. 

तेल - 
मोहाचे ताजे तेल पिवळ्या रंगाचे दिसते. नंतर ते हिरवट पिवळ्या रंगाचे होते. या तेलाची चव काहीशी कडवट लागते. तेल खाण्यासाठी वापरण्यापूर्वी आदिवासी लोक हे तेल चांगले तापवून घेतात, यामुळे त्यातील कडवट तत्त्व निघून जाते. थंड झाल्यावर नंतर साठवून ठेवतात. 
1. खाद्यतेल म्हणून उपयोग. 
2. खाद्यतेल व तुपामध्ये योग्य प्रमाणात मिसळण्यासाठी उपयोग. 
3. साबण बनविण्याच्या उद्योगात उपयोग. 
4. त्वचारोग, पोटाचे आजार, डोकेदुखी, जुनी बद्धकोष्ठता, मूळव्याध, रक्तस्राव थांबविण्यासाठी, डोक्‍याच्या केसांसाठी, शरीराला मालिश करण्यासाठी, ओकारी आणण्यासाठी, स्नायूंचे दुखणे, हाडांचे दुखणे, सांधेदुखी, तळपायांच्या भेगांसाठी गुणकारी. 
5. तेलापासून जैव इंधन. 

मोहाची पेंड - 
1. शेतीसाठी चांगले सेंद्रिय खत 
2. मातीमधील किडी- जसे हुमणी, मुळे कुरतडणारी अळी, खेकडे व सूत्रकृमी यांच्या नियंत्रणावर एक चांगले कीडनाशक म्हणून उपयोग. 
3. भातशेतीत खोडकिड्याचे प्रभावी नियंत्रण. 
4. तलावात मासे सोडण्यापूर्वी स्थानिक माशांच्या नियंत्रणासाठी या पेंडीचा उपयोग करतात. 
5. आदिवासी भागात शिकेकाईप्रमाणे डोक्‍याचे केस धुण्यासाठी पेंडीचा उपयोग करतात. 
मोहाच्या झाडाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व - 
- मोहाच्या बियांमधील (मोहिटी) तेलाचे प्रमाण 45 ते 50 टक्के. 
- एका मोहाच्या मोठ्या झाडापासून वर्षाकाठी 100 ते 120 किलो बिया आणि 70 ते 80 किलो फुले मिळतात. 
- फुले व बिया गोळा करण्याचा हंगाम एप्रिल ते जून महिना. 
- सुकलेल्या फुलांमध्ये 71 टक्के साखरेचे प्रमाण. 
- एक टन वाळलेल्या फुलांपासून 130 लिटर अब्सलुट (विशुद्ध) अल्कोहल तयार करण्याची क्षमता. 

संशोधनाची गरज - 
1) या बहुउपयोगी झाडावर उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे संशोधन झाले आहे. या विद्यापीठाने त्या भागात चांगल्या येणाऱ्या मोहाच्या जातींची निवड केलेली आहे. आपल्याकडेही जास्त तेल उतारा असलेल्या मोहाच्या जाती विकसित झाल्यास त्याचा शतेकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. 
2) कोकणामध्ये नैसर्गिकरीत्या वाढलेली मोहाची भरपूर झाडे आहेत. यामधून चांगले उत्पादन देणारे आणि बियामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असणाऱ्या झाडांची निवड करणे गरजेचे आहे. 
3) तेल काढण्याच्या पद्धतीबाबत अद्ययावत तंत्रज्ञान, तसेच कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाबाबत तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. 
4) मोहाच्या फुलांपासून अल्कोहोलनिर्मिती करून त्याचा इंधनासाठी वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित होणे, तसेच बियांपासून मिळणाऱ्या तेलाचा बायोडिझेल म्हणून उपयोग शक्‍य आहे. 
4. मोहाच्या फुलांमध्ये जास्त असलेले साखरेचे प्रमाण (71 टक्के) लक्षात घेता यापासून प्रक्रियायुक्त पौष्टिक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. 
5. मोहाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीत 19.5 टक्के क्रूड प्रोटीन असते. या पेंडीचा उपयोग जनावरांच्या पशुखाद्यात किंवा बायपास प्रोटीन म्हणून करता येऊ शकतो. 
6. पेंडीचा उपयोग वेगवेगळ्या पिकांमध्ये खत व कीडनाशक म्हणून कसा करता येईल, याबाबत संशोधनाची गरज आहे. 

संपर्क प्रा. उत्तम सहाणे - 8087985890 
प्रा. जगन्नाथ सावे - 9226417046 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.

Saturday, May 16, 2020

पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.

अकोल्यापासून चे अंतर : 47.2 km.
पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.

“विश्रामगड” सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्र्यांयची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.
इतिहास :
पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्र्यांाचा उपयोग होत असे. शिवरार्यांवनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण ’विश्रामगड’ असे केले. जालान्याची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे र्यां चे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्र्यांनना जिंकून घ्यावा लागला.
पहाण्याची ठिकाणे :
पट्टावाडीतून पायर्यांच्या वाटेने वर आल्यावर दोन गुहा लागतात.यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. दुसर्याध गुहेत राहाता येते. या गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत, पण वापरात नसल्याने त्र्यांधची अवस्था वाईट आहे. या गुहां जवळून जाणार्याक पायर्यां च्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी – हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. मधे तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्यां चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते. प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्याज लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिरा समोरून उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला “अंबरखाना” म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. येथून वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला ( औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे काही गुहा लागतात. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची टाकी लागतात, त्र्यांाना “बारा टाकी” म्हणून ओळखतात. येथून सरळ जाणार्याक वाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. बारा टाकी पासून परत फिरुन परत येतांना थोडे खालच्या बाजूस उतरून आल्यास अजून काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
इतिहास :
पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुल पुन्हा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्या. चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्याा वाटेने आपल्याला परत सुरुवातीला पाहिलेल्या गुहेपाशी जाता येते. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात.------------नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड,  हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गाची मालिकाच आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. या सगळ्या किल्ल्यांतील पट्टा ऊर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.  महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभलेय, तसेच ते अकोले तालुक्याच्याही वाटयाला आलेय. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्री पर्वताची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. त्यात नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गाची मालिकाच आपल्याला भेटते.
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. या सगळ्या किल्ल्यांतील पट्टा ऊर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय.  महाराजांच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.
नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आजही हा गड ताठ मानेने मोठया दिमाखात उभा आहे. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे.
या किल्ल्याची भौगोलिक रचना वैशिष्टय़पूर्ण अशीच आहे. एरियल व्ह्यूने पाहिल्यास या किल्ल्याचा आकार आकाशातील पंख पसरलेल्या गरुडाप्रमाणे दिसतो! पट्टा किल्ला एका अर्थाने हिंदवी स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्दच होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एक हजार ३९२ मीटर (४५६६ फूट) इतकी आहे. इतिहास काळातल्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यास फार मोठा इतिहास या गडाला असल्याचे कुठेही सापडत नाही. पण गडाचे तालेवार सोबती पाहता, तेथील भग्नावशेष पाहता या गडाचा उपयोग इतिहासकाळात नक्की झाला असेल, याची खात्री पटते.
एकेकाळी शत्रू सन्यावर आग ओकणारी बुलंद तोफ. आज मात्र गडाच्या पायथ्याशी निद्रिस्त अवस्थेत आहे. पूर्वेकडून चढाई करत वर गेले की, पहिल्या टप्प्यात एका सरळसोट कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. गडावर जाताना एका गुहेत थोर तपस्वी लक्ष्मण महाराजांची समाधी लागते. दुस-या गुंफेत काळ्या कातळातून पाझरलेले थंडगार पाणी आहे. आणखीन थोडे चढून वर गेले की, उत्तराभिमुखी त्र्यंबक दरवाजा येतो. त्याचे बांधकाम इतके भक्कम आहे, त्यामुळे आजही तो एकदम सुस्थितीत आहे.
किल्ल्याच्या पठाराकडे जाताना मध्येच एक देवीचे मंदिर लागते. भगवती देवीच्या मंदिराचे सध्या बांधकाम सुरू आहे. या मंदिराभोवती पुन्हा पाण्याची टाकी आहेत, ती कातळात कोरलेली आहेत. बहुदा ही यादवकालीन असावीत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गडावर अष्टभुजा ऊर्फ भगवती या देवीची यात्रा भरते. परिसरातील आदिवासी भाविक मोठया संख्येने गडावर येतात.
एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या घटका मोजतोय. पावसाळ्यात गाई-गुरांना निवारा म्हणून गुराखी या राजवाडयाचा वापर करतात. किरकोळ डागडुजी केल्यास हा महाल पुन्हा दिमाखाने उभा राहील. याखेरीज ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावरून निसटण्यासाठी येथे चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा म्हणजे शिवकाळातील स्थापत्य विशेषाचा एक आदर्श असा नमुनाच. गडावर तब्बल ३० पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.
पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात तिकडे तरहेतरहेची रानफुलं फुलतात. अनेक औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. वर पोहोचल्यावर गडावरून पाहिले की, सभोवार चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. लांबवर पश्चिमेस कळसूबाई, अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्गत्रिकुट खुणावत राहते. दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा जणू आपल्याला हात हालवताहेत. इगतपुरी म्हणजे महाराष्ट्रातील धरणांचा तालुका. विश्रामगडावरच्या पश्चिम टोकाला उभे राहून पाहिले की विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयांचे विहंगम दृश्य डोळ्यांना सुखावते. या गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे अकोल्यातल्या इतर गडांपेक्षा विश्रामगड जास्त भाग्यवान म्हटला पाहिजे. कारण शिवस्पर्श झाल्याने ही भूमी पावन झालीये. सन १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज पुढे चालले होते. नाणेघाटमाग्रे कल्याणवरून रायगड असे जाण्याचे नियोजन होते.
दरम्यान, महाराज सोने-नाणे अशी लूट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर पिसाळलेला मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळ दोन्ही सन्यांची गाठ पडली. दिनांक १८, १९ आणि २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सन्यांत तुंबळ युद्ध झाले. संघोजी निंबाळकर खानाबरोबर भिडला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. अखेर तो धारातीर्थी पडला. महाराजांबरोबर असलेल्या साडेआठ हजार सन्यापैकी चार हजार सन्य कामी आले. शत्रू सन्याने महाराजांना घेरले होते. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येऊन धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे व्हायचे, बाकीच्या सन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली.
राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज मध्यरात्री संगमनेरहून पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. दाट जंगल आणि िहस्र् श्वापदे यांचा वावर. रामायण काळातले दंडकारण्य म्हणतात तो हाच परिसर. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करीत महाराज गडावर सुखरूप पोहोचले. अर्थातच यात बहिर्जीचा मोठा वाटा होता.
संगमनेरजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. जवळपास १७ दिवस त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्येत खालावली होती. येथील थंडगार, शुद्ध हवा आणि जीवाला जीव देणा-या आदिवासी महादेव कोळ्यांच्या कडेकोट पहा-यात थकलेल्या राजांना विश्रांती मिळाली. पुढे राजे कल्याणमाग्रे रायगडावर पोहोचले. गडावरून परतताना दस्तुरखुद्द राजांनीच या किल्ल्याचे नामांतर ‘विश्रामगड’ असे केले. परंतु याला पट्टा (किल्ला) का म्हणतात त्याचा मात्र उलगडा होत नाही. त्याचे तसे उल्लेख कुठे सापडत नाहीत. बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य काही काळ या गडावर होते.
सह्याद्रीच्या या पुण्यभूमीला वंदन करायला, गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळायला आणि त्यावरचा इतिहास वाचायला आतुरलेले अनेक दुर्गभटके इथल्या रानवाटा तुडवत बाराही महिने फिरत असतात. पहाटेच गावातून अत्यंत मळलेल्या वाटेने आम्ही पंधरा मिनिटांतच एका गुहेसमोर पोहोचलो. ही गुहा म्हणजे लक्ष्मणगिरी महाराजांचे समाधीस्थान आहे.
महाराजांच्या दर्शनासाठी येथील पंचक्रोशीतील अनेक भक्तांचा राबता असतो. पौर्णिमेच्या दिवशीच या गुहेचं दार उघडत असल्याने या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळेच या परिसरातील भक्तमंडळी पट्टागडाला ‘लक्ष्मणगिरी महाराजांचा डोंगर’ म्हणून देखील ओळखतात. आम्हीही पौर्णिमेच्या दिवशीच आलो असल्याने येथे माथा टेकवूनच पुढे निघालो असता काही पाय-या पार करून दुसरी गुहा व त्याच्या शेजारीच गडाची अधिष्ठात्री पट्टाईदेवी समोर! देवीच्या नावामुळेच या गडाचे नाव पट्टागड पडले असावे, असं वाटतं.
तीन कमानीची अतिशय सुंदर व सुस्थितीत गडावर असलेली एकमेव वास्तू अंबारखाना. ‘बारा टाकी’ म्हणून प्रसिद्ध असलेली व एका रांगेत असलेली ही पाण्याच्या टाक्यांची माळ मात्र थांबून पाहावी अशीच आहे. विरंगुळयाची ‘अनमोल’ शिदोरी पाठीशी बांधून देणारा हा पट्टागड एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

तालुक्यातील टोमॅटो पिकाला गूढ व्हायरस झाल्याने एक हजार एकर क्षेत्रात टोमॅटो खराब झाले असून सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज टोमॅटो शेती क्षेत्रातील तज्ञ व्यक्त

राजूर  , ता . १६:तालुक्यातील टोमॅटो पिकाला गूढ व्हायरस झाल्याने एक हजार एकर क्षेत्रात टोमॅटो खराब झाले असून सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज टोमॅटो शेती क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत . टोमॅटो बियाणे कंपनी व कृषी विभाग यांचा समन्वय नसल्याने तसेच कृषी विधापीठाने नमुने बॅंगलोरला पाठवून वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी महेश नवले , विलास भांगरे आदी दहा शेतकऱ्यांनी केला आहे.
कोरोनामुळे भाजीपाला भाव घेतले असून त्यात टोमॅटो व्हायरस मुळे टोमॅटोचा रंग बदलतो कडकपणा जातो व फळ आपोआप खराब होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे . झाडावर रोग कि बियाणे खराब याबाबत शंका असून कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी मंगळवारी खास गाडी करून कृषी आयुक्त यांची विशेष परवानगी घेऊन बेंगलोर येथे तपासणीसाठी मंगळवारी पहाटे ६ वाजता खास वाहनाने पाठविण्यात आले आहेत. ते रात्री ९. १५ वाजता पोहचले असून मंगळवारी त्याचा रिपोर्ट येणार आहे. अकोले येथील शेतकरी महेश नवले यांचे चार एकर तर तांभोळ येथील विलास भांगरे यांची साडेसात एकर अश्या ४०० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यामुळे राहुरी कृषी विधापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ . एस व्ही कोळसे , डॉ विवेक शनिदे डॉ अनिकेत चंदनशिवे , यांच्या पथकाने प्लॉटला भेट देऊन नमुने बॅंगलोर ला पाठविले आहे विलास काशिनाथ भांगरे मु.पो. तांभोळ ता. अकोले जि. अहमदनगर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये सिजेंटा कंपनीचे '१०५७' आणि सेमिनिस कंपनीचे 'आयुष्यमान' या दोन हायब्रीड वाणांची लागवड माझ्या शेतामध्ये केली होती. यावर्षी दरवर्षीप्रमाणेच टोमॅटोचे प्लॉट अतिशय सुंदर व निरोगी आले. परंतु टोमॅटो सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये फळावर वेगवेगळे डाग, तिरंगा लूज पडणे या समस्या जाणवायला लागल्या. त्यानंतर मी कंपनी प्रतिनिधीशी संपर्क केला कंपनी प्रतिनिधींनी टोमॅटोचे सॅम्पल बंगलोर येथील संशोधन लॅबमध्ये पाठवले परंतु त्याचे रिपोर्ट मात्र आम्हाला दिले नाही त्यांनी आम्हाला कंपनी गोपनीयतेचे कारण सांगितले. त्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांचेकडे सामूहिक व वैयक्तिक निवेदने दिली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन लॉक डाऊन असतानाही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम आमच्या शेतामध्ये पाहणीसाठी आली. परंतु त्यांचेही रिपोर्ट आले नाही त्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला तेव्हा असे समजले पुन्हा एकदा टोमॅटोचे आणि बियाण्याचे सॅम्पल बंगलोरला पाठवले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच तुम्हाला रिपोर्ट मिळतील वास्तविक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नामवंत कृषी विद्यापीठ आहे. आणि तेथे टोमॅटोच्या वाणांना परवानगी देताना ट्रायल घेतल्या जातात सदर विद्यापीठात मोठमोठे शास्त्रज्ञ असताना. त्यांनी पाहणी केल्यानंतर ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसतील तर मात्र शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण होतो.यात कंपनी व अधिकारी यांचा दुर्लक्ष्यपण आहे तर महेश नवले यांनीही याला दुजोरा दिला आहे . सरकारने संबंधित कंपनी व कृषी विभाग यांचेकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे म्हटले आहे नमस्कार,मी महेश नवले आगार गावातील टोमॅटो उत्पादक शेतकरी असून मी गेली अनेक वर्षापासून अत्यंत आधुनिक पद्धतीने टोमॅटोची शेती करीत आहे. मझ्या वडिलांनी १९८४ पासून १९९८ पर्यंत जुन्या देशी वाणांची टोमॅटोची शेती केली त्यामध्ये गोलटा, मदनफल्ली, चमेली, मोगरा यासारखे त्याकाळातील टोमॅटोचे वाण पिकवले, नंतरच्या कालखंडामध्ये १९९९ साली मी स्वतः नामधारी कंपनीचे उस्तव, १८१२, १८१५ या सुधारित वाणाचे उत्पादन घेतले. त्यानंतर सिंघाता कंपनीचे अभिनव, अविनाश, अविनाश २ ही नवीन वाणाचे उत्पादन घेतले. सिंजेटा व सेमिनिज या कंपनीचे सध्या माझ्या ४ एकर श्रेत्रामध्ये टोमॅटो उत्पादन चालू आहे. माझ्या टोमॅटो लागवडाचा हंगाम हा दरवर्षी १५ फेब्रुवारी ते ३० मार्च ह्यादरम्यान निश्चित ठरलेला असतो. सुधारित तंत्रज्ञानानुसार ह्यागोष्टी करणे गरजेजे आहे शेणखतापासून ते जैविक तंत्रज्ञानापर्यंत असे सर्व प्रयोग आम्ही दरवर्षी आमच्या शेतात करत असतो. त्यामुळे आम्हाला दरवर्षी भरघोस उत्प्पन मिळत होते. ह्यावर्षी तोच प्रयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांनी अगदी ठरलेल्या वेळेत अत्यंत कुशलतेने प्रयोग केला. टोमॅटोच्या झाडांची गुणवत्ता एकूण आमचे व्यवस्थापन यामुळे टोमॅटो बांधणी होईपर्यंत प्लॉट अत्यंत सुंदर अवस्थेत उभे होते परंतु , जेव्हा फळे काढणीला आले तेव्हा मात्र फळांची अवस्था व रंग बघता हे फळे खाण्यायोग्य नाही हे लक्षात आले आणि बघता बघता एका आठवड्यामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये फळे खराब झाली. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि राज्य सरकारच्या कृषी विभाग प्रत्यक्ष पाहणीला आले नंतर बियानामध्ये व्हायरस आलेले आहे अशा प्रकारच्या चर्चा करू लागले. परंतु आमचे म्हणने असे आहे की, अशा प्रकारच्या टोमॅटोच्या रोगग्रस्त असल्याची ही पहिली वेळ नाही. ह्यापूर्वी देखील अनेक वेळा अशा प्रकारच्या रोगाची झाडे प्लॉट मध्ये असायची पण त्याचप्रमाणे एकूण झाडांच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजे १ % असायचे त्यामुळे शेतकरी ह्याकडे दुर्लक्ष करायचा. आमच्या शेतकऱ्यांच्या अनुभवा अंती असे म्हणतो आहे की एखादी टोमॅटोचा नवीन वान बाजारात आल्यानंतर त्या वाणाचा व्हरायटीचा टाइम पिरीयड हा ३ ते ४ वर्षाच्या पुढे टिकत नाही याची अनेक उदाहरणे आहेत ह्या कंपनीच्या काळानुसार आम्ही केलेल्या अनेक वाणाच्या प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे. आमचे म्हणणे हेच आहे की मल्टीनेशनल कंपनीच्या बियाण्यांची दरवर्षी विभागप्रमाणे त्याची ट्रायल होणे अपेक्षित आहे. जर ती ट्रायल विभागाप्रमाणे व हंगामाप्रमाणे गेली असती तर आज ह्या हंगामामध्ये महाराष्ट्रात जेवढे टोमॅटो उत्पादक शेतकरी ह्या यंत्रणेच्या चुकीमुळे आज संकटात आहेत याला जबाबदार राज्याचे कृषी मंत्रालय, कृषी आयुक्त व कृषी विद्यापीठ हेच जबाबदार आहेत.याचे कारण बेंगलोर, आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागात ह्यामध्ये रब्बी मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर ज्या टोमॅटोच्या लागवडी झाल्या त्यामध्ये हा व्हायरस आढळून आला होता. जर कृषी विद्यापीठ व कृषी आयुक्त यांनी ह्याची दखल घेतली असती मल्टीनेशनल कंपनीच्या बियाणे विक्रीस प्रतिबंध घातला असता व शेतकऱ्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले असते तर आज संपूर्ण शेतकरी वाचला असता. त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की राज्याचे कृषी विभाग, विद्यापीठ व मल्टीनेशनल कंपन्या कारवाई करावी व सर्व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आहे.
प्रवीण गोसावी ( तालुका कृषी अधिकारी )- तालुक्यात टोमॅटो व्हायरस मुळे शेत करी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून याबाबत तातडीने पाऊले उचलून महात्मा फुले कृषी विधापीठ राहुरी येथील वैज्ञानिक दोन वेळा आणून शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन पाहणी केली दुसऱ्या वेळी बियाणात दोष , झाडात दोष कि फळात दोष याबाबत बियाणे , झाडाची फांदी , केमिकल , फळे याचे नमुने वातानुकूलित बॉक्स मध्ये घेऊन तसेच कृषी आयुक्त यांची विशेष परवानगी घेऊन बेंगलोर येथे तपासणीसाठी मंगळवारी पहाटे ६ वाजता खास वाहनाने पाठविण्यात आले आहेत. ते रात्री ९. १५ वाजता पोहचले असून मंगळवारी त्याचा रिपोर्ट येणार आहे मात्र टोमॅटो खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो या अफवा असून कोणताही आजार होत नसून त्या अफवा त्वरित थांबवाव्यात .
वैभव पिचड (माजी आमदार )- तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कृषी आयुक्त व जिल्हाकृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू न बंगलोर येथील नमुना तपासणी अहवाल त्वरित आणून व पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली असूनयाबाबत तातडीने पंचनामे करून व खते बियाणे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
अजित नवले (माकप )
टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.
वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे.फोटो akl १६p ३,६,७












Friday, May 8, 2020

पांडुरंग तात्या नवले यांनी जोपासली सेंद्रिय शेती


रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत व कोविड प्रादुर्भाव

अकोले , ता . ९:रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत व कोविड प्रादुर्भाव रोखण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलून सिमेंटच्या ट्रकमधून परप्रांतीय  पळून जाणारे  २३ मजूर व ट्रक अकोले पोलिसांनी रात्री अकरा वाजण्याच्या  सुमारास ताब्यात घेऊन त्या २३ मजुरांना पुन्हा मवेशी येथे पाठविण्यात आले .अशी माहिती पोलीस इन्स्पेकटर अरविंद जोंधळे यांनी दिली . 
याबाबतचे वृत्त असे कि, मवेशी येथेएकलव्य आश्रम शाळेचे बांधकाम सुरु असून त्याकरिता उत्तरप्रदेश , बिहार येथून मजूर कामासाठी आले होते मात्र लॉक डाऊन व ठेकेदार यांचे कडून वेळेवर मजुरी मिळत नसल्याने हे मजूर अस्वस्थ होते .८ मे रोजी चांदवड येथील १० टायर ट्रक नंबर एम एच १५जी व्ही ७४९७हि सिमेंट घेऊन आली असता त्या मजुरांनी ट्रक चालक शंकर सदाशिव पवार यास पटवून रात्री ११ वाजता २३ मजूर महिला मुलासह बसून जात असताना अकोले येथील महात्मा फुले चौकात नाकाबंदी असतानातसेच कोविड  १९ प्रादुर्भाव होऊ नये याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असतानाही दिनांक १९ मार्चच्या आदेशांनव्ये १९५१चे कलम ४३(३)भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ व कोरोचा प्रादुर्भाव झाल्यास कायदेशीर कारवाई आदेश असताना चालकाने त्या २३ मजुरांना बेकायदेशीरपणे चालविले असताना पोलीस कॉन्स्टेबल राम  मनोहर  लहामगे यांनी १८८,२६९ मोटार वाहन कायदा कलम ६६(१)१९२ प्रमाणे ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करून सर्व मजुरांना पुन्हा मवेशी येथे पाठविण्यात आल्याचे पोलीस इन्स्पेक्टर अरविंद जोंधळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले .पुढील तपस हेड कॉ . भोसले करीत आहे  चौकट -- या मजुरांनी तहसीलदार अकोले यांचेकडे जाण्यासाठी मंजुरी मागितली होती तहसीलदार यांनी त्यास साकारत्मकता दाखवून दोन दिवसांनी त्या मजुरांची जाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार होती मात्र त्या आधीच हे मजूर पळण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या हाती सापडले . सोबत फोटो akl ९प २,३     

Wednesday, May 6, 2020

सरकार आदिवासींना शेतीही करू देणार नसेल तर किमान आत्महत्या करण्याची परवानगी तरी देणार का, असा जळजळीत सवाल ‘वयम्’ संस्थेच्या मिलिंद थत्ते यांनी केला आहे.

संदीप आचार्य 
मुंबई: करोना लॉकडाउनमुळे उभ्या महाराष्ट्राची आर्थिक वाताहात होत आहे. उद्योजक त्रस्त आहेत तर बळीराजा अस्वस्थ आहे. अशात उपाशीपोटी असलेल्या रानावनातील आदिवासी आपल्या हक्काच्या जमिनीवर धान्य पिकवू पाहातो तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे लावण्याचा सपाटा लावला आहे. खुद्द राज्यपालांनी पालघर जिल्ह्यात भेट देऊन जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील शेतीकरणाऱ्या आदिवासींवर गुन्हे दाखल करू नका असे सांगितल्यानंतरही शेकडो गुन्हे दाखल झाले असून आदिवासींनी आता या अन्यायाविरोधात लढा पुकारला आहे. आमची न्यायासाठी लढाई सुरू असून सरकार आदिवासींना शेतीही करू देणार नसेल तर किमान आत्महत्या करण्याची परवानगी तरी देणार का, असा जळजळीत सवाल ‘वयम्’ संस्थेच्या मिलिंद थत्ते यांनी केला आहे.
राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात सरकारने वनहक्क व पेसा कायद्यानुसार परंपरेने जे आदिवासी जमीन कसतात त्यांना शेतीचे हक्क दिले आहेत. एरवी पोटापाण्यासाठी वीट भट्टीवर व अन्यत्र मजुरीचे काम करणारा आदिवासी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या घरी परतून शेतीच्या कामाला लागतो. पेरणीपूर्वी पालापाचोळा, काटक्या, गवत शेण पसरून राबा करण्याची जव्हार, विक्रमगड व मोखाडा येथील आदिवासींची पद्धत आहे. १९७८ साली या पद्धतीला शासनानेही मान्यता दिली असताना शेकडो आदिवासींवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. शेतात राबा केला म्हणून, कुंपण घातले, विहिर खणली तसेच शेतात झोपडे बांधले अशा कारणांसाठी आदिवासींवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आता या आदिवासींनी जगायच कसं? असा सवाल ‘वयम’ ही आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेने केला आहे.
“करोनामुळे राज्यातील सारेच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातही ज्या दानशूर व्यक्ती व संस्था आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत होत्या ती मदतही आटली आहे. कारण बहुतेक दानशूर व्यक्ती व संस्था करोना रुग्णांच्या मदत कार्यात गुंतले आहेत” असं ‘वयम्’ च्या मिलिंद थत्ते यांनी सांगितले. “गेल्या दोन वर्षात विविध आदिवासी संघटनांनी वनविभागाच्या या जुलमांविरोधात वेळोवेळी आवाज उठवला. मोर्चे काढले तरीही वनविभागाच्या अधिकार्यांनी शेती करणाऱ्या आदिवासींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच ठेवले. फेब्रुवारी मध्ये राज्यपाल कोश्यारी यांनी पालघर येथील डायपाडा येथे भेट दिली तेव्हा ‘वयम्’सह विविध संघटनांनी आदिवासींवर वनविभागाकडून होणाऱ्या जुलमाची माहिती दिली. तेव्हा राज्यपालांनी तात्काळ आदिवासींवरील गुन्हे दाखल करणे बंद करण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही वनविभागाकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच आहे” असंही मिलिंद थत्ते यांनी सांगितले.
“आत्ताच्या गंभीर बेरोजगारीच्या काळात आदिवासींनी करायचे तरी काय, असा सवाल त्यांनी राज्यपाल कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. शेतीतील प्रत्येक बारीकसारीक कामाला गुन्हे ठरविण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करत आहेत. गेल्या दोन महिन्यात किमान सातआठशे गुन्हे आदिवासींवर दाखल करण्यात आले असून शेतीही करू दिली जाणार नसेल तर आम्हाला आता आत्महत्या करण्याची तरी परवानगी देणार का?” असा जळजळीत सवाल मिलिंद थत्ते यांनी केला आहे.

कांडेसर करकोचा

कमल

कमल पक्षी

pakshi

pakshi

Friday, May 1, 2020

ममता मावशीचा शेकडो चिमन्यासाठी नैसर्गिक मंडप




अकोले ,ता . २:-धकाधकीच्या जीवनात माणूस माणसाकडे बघत नाही ,विचारपूस करत नाही , एकमेकांना वेळही देत नाही , काळजी करत नाही .याला अपवाद आहेत अकोले तालुक्यातील देवगावच्या फूड मदर  ममताबाई देवराम भांगरे .   देश आणि विदेशात फूड मदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना जीव लावतात . घरी आलेल्या प्रत्येकाला त्या आपलस करून टाकतात .त्यांनी उभारलेल्या अंगणात नैसर्गिक मांडवात  रोजचे शेकडो पाहुणे येतात .तुम्ही जरा विचारात पडला असाल की, रोजचे शेकडो पाहुणे कश्यासाठी बर येत असतील ममतामावशींकडे .           हो रोजचं येतात आणि अगदी मुक्कामी येतात कारण त्यांना हवी असलेली मायेची ऊब ममता मावशींच्या घरात त्यांना मिळते .       एकही दिवस चुकत नाही या पाहुण्यांचा असे कोण बर असतील हे पाहुणे ? निसर्गातून आपल्या अंगणातून नामशेष होत चाललेली चिऊ ताई म्हणजेच चिमणी . हो याच  चिमण्या शेकडोंच्या संख्येने येतात.तर पारवे , साळुंखी ,कोकिळा ,भार्गव  मावशींकडे रोज मुक्कामी आणि अगदी हक्काने आणि खात्रीने   . कारण मावशी आपल्या घरच्या सदस्यांना स्वयंपाक करण्यागोदर सोय करतात. या त्यांच्या लाडक्या चिमण्यांची. व पाखरांची         त्यांना लागणारे खाद्य त्या अगोदर ठरलेल्या जागी नेऊन ठेवतात, आणि पिण्यासाठी भरपूर पाणीही . या चिमण्या इतक्या लाडक्या झाल्या आहेत की, मावशी जणू काही त्यांची आईच अगदी तिच्या जवळ येऊन तिच्याशी लाड घालणार. मुळातच ममता मावशीं वाढली ती ग्रामीण भागात आणि त्यातून शेतकरी कुटुंबात . लहानपानापासून तिला आई वडिलांकडून प्राणीमात्रांवर दया करावी त्याना आपल्या घासतील घास भरवावा हे संस्कार झाले. तिच्या माहेरीही मुक्या प्राणी आणि पक्ष्यांना आई नेहमी सकाळी-सकाळी दाणे आणि पाणी भरून ठेवायची . हेच संस्कार आणि विचार तिने सासरी म्हणजे सध्या राहत असलेल्या देवगावात नेले. तिचे विचार एकल्यावर माणूस म्हणून जगताना कसे जगावे हे समजल्याशिवाय राहत नाही. तिने अंगणात भला मोठा झाडं-वेलींचा मांडव घातला आहे का माहीत आहे . कुणीही पाहुणा आला की त्याला या मांडवात विसावा घेता यावा आणि पक्ष्यांना बसायला आणि विसावा घ्यायला हक्काची जागा मिळावी म्हणून .खरच किती महान विचारांची माणसं आजही या जगात आहेत.   चौकट- एकदा उभ्या पिकात मोकाट ढोर शिरलं,मी तिला विचारलं कुणाचं आहे,आपली आहे का?त्यावर तिनं उत्तर दिलं, कुणाच हाय ते माहीत नाही.पण पक्क भुकेलं दिसतंय,खाउद्या काय खायचे त्याला. मूक आहे बिचारं. मी विचार केला, मावशीच्या जागी कुणी दुसरं असत तर मोठा आरडाओरडा केला असता.आणि ज्याम शिव्या हसडल्या असत्या.आणि वरून त्या मुक्या जनावराला बदडल  असते.यावरून मावशीच्या मनाचा अंदाज व मोठेपणा जाणवला.              स्वार्थांनी भरलेल्या जगात आपल्या वेगळ्या विश्वात रमणारी माणसही आहेत जगात . कुठलीही अपेक्ष न करता त्या हे सर्व करतात. फक्त आत्मिक आनंद मिळविण्यासाठी आणि तो आनंद दिसतोही अगदी त्यांचा वागण्यात आणि कृतीतून .                          जितीन साठे, नाशिक विभागीय अधिकारी, बायफ, नाशिक सोबत फोटो akl २p २,३
Attachments area

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...